Maharashtra Assembly Poll: काँग्रेससमोर बंडखोरी रोखण्याचे तर भाजपसमोर इच्छुकांचे आव्हान

कधीकाळी काँग्रेस, शिवसेनेचा बालेकिल्ला असणारा शिवाजीनगर मतदारसंघ 10 वर्षांपासून भाजपच्या ताब्यात आहे.
Maharashtra Assembly Poll
काँग्रेससमोर बंडखोरी रोखण्याचे तर भाजपसमोर इच्छुकांचे आव्हानPudhari
Published on
Updated on

गजानन शुक्ला

Pune Political News: कधीकाळी काँग्रेस, शिवसेनेचा (Shivsena) बालेकिल्ला असणारा शिवाजीनगर मतदारसंघ 10 वर्षांपासून भाजपच्या ताब्यात आहे. विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळे यांना भाजपकडून पुन्हा संधी दिली जाण्याची दाट शक्यता आहे. तर, काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू आहे. उमेदवारी निष्ठावंताला की आयात उमेदवाराला, अशी स्थिती काँग्रेससमोर उभी ठाकली आहे. बंडखोरीला रोखण्याचे मोठे आव्हान काँग्रेससमोर (Congress) राहणार आहे.

शिवाजीनगर मतदारसंघ उच्चभ्रू मध्यमवर्गीय आणि वस्ती, असा संमिश्र आहे. शिवाजीनगर, गोखलेनगर, वडारवाडी, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड, बोपोडी हा झोपडपट्टी आणि मध्यमवर्गीय वस्तीचा भाग आहे. हा वर्ग काँग्रेसला मानणारा आहे. तर औंध, भोसलेनगर, मॉडर्न कॉलनी, जंगली महाराज रस्ता, आपटे रस्ता, प्रभात रस्ता हा उच्चभ्रू सोसायट्यांचा भाग आहे. यातील उच्चभ्रूवर्ग गेली अनेक वर्षे भाजपचा मतदार राहिला आहे. (Latest Political Update News)

Maharashtra Assembly Poll
Pune News: व्यावसायिकांच्या पुनर्वसनाचा दावा, पदपथांवर मात्र अतिक्रमणांचे पेव

मोदी लाटेत 2014 च्या विधानसभा निवडणुकीत विजय काळे यांचा पत्ता कट करून भाजपने 2019 च्या विधानसभा निवडणुकीत नगरसेवक असलेल्या सिद्धार्थ शिरोळे यांना उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत शिरोळे यांना 58 हजार 757 मते मिळाली होती, तर काँग्रेसच्या दत्ता बहिरट यांना 53 हजार 603 आणि वंचितच्या अनिल कुराडे यांना 10 हजार 454 मते मिळाली होती.

चुरशीच्या या निवडणुकीमध्ये काँग्रेसची नेतेमंडळी ऐनवेळी फोडूनसुद्धा शिरोळे यांचा अवघ्या 5 हजार 124 मतांनी विजय झाला. या निवडणुकीत वंचितचा उमेदवार नसता, तर कदाचित वेगळा निकाल लागला असता. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवाजीनगरमधून भाजपला अपेक्षित मताधिक्य मिळाले नाही.

विद्यमान आमदार असताना मुरलीधर मोहोळ यांना केवळ 3 हजार 800 मतांचे लीड मिळाले. घटते मताधिक्य शिरोळे यांच्यासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. या पार्श्वभूमीवर आता होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी अवघा महिनाभराचा अवधी राहिला आहे. यामुळे सगळ्याच पक्षांतील इच्छुक उमेदवार जोरदार तयारी करू लागले आहेत.

Maharashtra Assembly Poll
Maharashtra Dams: राज्यातील धरणसाठा 88 टक्के; सर्व धरणे ‘हाऊसफुल्ल’

महायुतीत शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ हा भाजपच्या, तर महाविकास आघाडीत काँग्रेसच्या (Congress) वाट्याला आला आहे. या वेळी आमदार शिरोळे यांच्याबरोबर माजी नगरसेवक सनी निम्हण, अ‍ॅड. मधुकर मुसळे, संदीप काळे हेसुद्धा इच्छुक आहेत. याबरोबर काँग्रेसकडून माजी नगरसेवक दत्ता बहिरट, माजी आमदार दीप्ती चवधरी, मनीष आनंद यांच्यासह 10 जण उमेदवारी मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत.

दरम्यान, निम्हण यांनी अंदाज घेत काँग्रेसमधून उमेदवारी पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. मात्र, निम्हण यांना काँग्रेसमधील इच्छुकांनी कडाडून विरोध केला आहे. आमच्यापैकी एकाला उमेदवारी द्या, आम्ही त्याचे काम करू. मात्र, बाहेरच्याला उमेदवारी देऊ नये, अशी मागणी केली आहे. यामुळे पक्षश्रेष्ठी कोणाला उमेदवारी देतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news