Rana Suryavanshi Attack Case: राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणाचे गूढ कायम! २० दिवसांनंतरही तीन प्रमुख संशयित फरार; पोलिस तपासावर प्रश्नचिन्ह

भिगवणमधील विशाल धुमाळ आणि ज्ञानेश्वर सोळंकी यांच्यासह तिघांचा थांगपत्ता नाही; हल्ल्याचा सूत्रधार आणि कटामागील हेतू अद्याप गुलदस्त्यात
Police Investigation
Police InvestigationPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणातील प्रमुख तीन संशयित २० दिवसांनंतरही गायब आहेत. यामध्ये भिगवणचे विशाल धुमाळ व ज्ञानेश्वर सोळंकी या दोघांचा समावेश असून, हे तिघे आहेत तरी कुठे? ते सुरक्षित आहेत की त्यांना डांबून ठेवले आहे की, अजून काय झाले? याचे रहस्य उलगडण्यास तयार नाही. एरवी सुतावरून स्वर्ग गाठणाऱ्या पोलिसांवर राजकीय दबाव तर नाही ना? की राजकीय हस्तक्षेपामुळे प्रकरण दडपले जात आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Police Investigation
Sinhagad West Haveli Drought: सिंहगड-पश्चिम हवेलीत दुष्काळाने दिवाळीही कडू! ८० टक्क्यांहून अधिक भातपीक वाळले; घरात खाण्यासाठीही तांदूळ नाही

राणा प्रकरण वाटते तेवढे सोप्पे नाही. या प्रकरणाचा तपास ज्या वेगाने सुरू झाला तेवढ्याच वेगाने तो संथ होताना दिसत आहे. त्यातही पोलिस या विषयावर आता ‘ब्र’ शब्द काढायला तयार नाहीत. राणाची वाय प्लस सुरक्षा काढल्याने राणाला याचा झटका बसला असला तरी या हल्ल्यामगील गूढ उकलने गरजेचे आहे. हे प्रकरण पोलिसांना आवाहन देणारे तर आहेच, शिवाय ‘दूध का दूध पाणी का पाणी केले’ तरच कायद्यावरील विश्वास बळकट होणार आहे; अन्यथा कायद्याची लक्तरे वेशीला देखील टांगली जाणार आहेत. या हल्ला प्रकरणात संशयित गायब झालेले तिघे सुरुवातीपासून राणाबरोबर सावलीप्रमाणे होते; मात्र हा हल्ला घडवून आणल्याचे पोलिस तपासात पुढे येताच हे तिघे गायब झाले आहेत. आता २० दिवस उलटून गेले तरी त्यांचा थांगपत्ता नाही. नेमके ते आहेत कुठे? या शिवाय या प्रकरणात भिगवण भागातील व खुद्द दत्तकलामधील काही युवकांचा समावेश असल्याची चर्चा आहे. नव्हे तर पोलिसांच्या रडारवर देखील ते आहेत. यातील काहींना अटक देखील करण्यात आलेली आहे.

Police Investigation
Pune Diwali Fire Incidents: पुण्यात लक्ष्मीपूजनाच्या फटाक्यांनी धुमाकूळ! सात तासांत आगीच्या ४८ हून अधिक घटना

राणा प्रकरण हाय प्रोफाइल मानले जात आहे. आत्तापर्यंत राणाचा वावर मोठ्या थाटामाटात होता; मात्र स्वतःची सुरक्षा वाढवण्यासाठी आणि त्यातून व्यवसायात भरारी घेण्याचे स्वप्न त्याच्याच अंगलट आल्यानंतर राणाची प्रतिमा डागळली आणि स्वतः रचलेल्या चक्रव्यूहात तो अडकून बसला आहे. अलीकडे हा तपास थंडावत चालल्याने पोलिसांची भूमिका संशयास्पद वाटू लागली आहे. मुळात राणाला सुरक्षा देणारे अनेक बडे अधिकारी देखील संशयाच्या भोवऱ्यात सापडले असल्याने ते चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत.

Police Investigation
GST Council Recommendations 2026: जीएसटी करचुकवेगिरी प्रकरणांत अटकेची भीती कमी होणार? अटक अधिकार काढण्याची परिषदेची शिफारस

त्यात या प्रकरणाला राजकीय वलय असल्याचेही बोलले जात आहे. या प्रकरणाची पोलखोल झाली तर राणाला हे प्रकरण जड तर जाईल, शिवाय राजकीय नेतेही तोंडघशी पडण्याची शक्यता आहेच. यातून पोलिस खात्यालाही मोठा डाग लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोलिसांची चिडीचूप बरेच काही सांगून जात आहे. असे असले तरी या प्रकणाचा मोठा बोभाटा झाल्याने राणाच्या प्राणघातक हल्ला प्रकरणाचा तपास अर्धवट सोडणे कोणालाही परवडणारे नाही.

Police Investigation
Pune Underground Tunnel Project: पुण्यात वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ३१ किमीचे दोन भुयारी मार्ग! भोसरी-उंड्री आणि भूगाव-एरंडवणे जोडणार

या हल्ल्यामागील नेमका सूत्रधार कोण आणि एवढा मोठा कट रचण्यामागील मूळ हेतू काय होता, हे उघडकीस आणण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना अद्याप कोणतेही ठोस यश मिळालेले नाही. गंभीर आणि अतिशय क्लिष्ट गुन्ह्यांची पद्धतशीर उकल करण्यासाठी संपूर्ण राज्यात नावाजलेल्या पुणे ग्रामीण पोलिसांच्या कार्यक्षमतेसमोर प्रश्न उपस्थित करणारे ठरत आहे. प्रमुख संशयित ताब्यात घेतल्यानंतरच या प्रकरणाचा उलगडा होणार आहे तो पर्यंत तरी हे प्रकरण गुंतागुंतीचे आणि गुलदस्त्यात राहणार आहे. कारण राणा हल्ला प्रकरणाचा प्लॅन या भागात शिजला होता हे देखील आता लपून राहिले नाही. त्यामुळे यातील संशयित आरोपींची साखळी लांबली आहे. या प्रकणातील दडलेल छुपे कारणे उघड झाल्यानंतर राज्यात खळबळ माजण्याची शक्यता नाकारता येत नाही; मात्र राजकीय दबावातून या प्रकरणातील खरा खलनायक व सूत्रधार मोकाट असल्याची चर्चा आहे. या गूढ प्रकरणाचा संपूर्ण छडा लागणे अत्यंत कठीण बनले आहे. यासाठी फरार तीन संशयित आरोपी या प्रकरणाचा केंद्रबिंदू आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.