Pune Diwali Fire Incidents: पुण्यात लक्ष्मीपूजनाच्या फटाक्यांनी धुमाकूळ! सात तासांत आगीच्या ४८ हून अधिक घटना

झाडे, गवत, घरे, दुकाने आणि गोदामांना आग; सिटीप्राईडजवळ फ्लेक्स प्रिंटिंग दुकानही आगीच्या भक्ष्यस्थानी, सुदैवाने जीवितहानी नाही
Fire
FirePudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फटाक्यांच्या आतषबाजीदरम्यान पुणे शहरात विविध ठिकाणी आगीच्या ४८ हून अधिक घटना घडल्या. दुपारी ३ ते रात्री १० या ७ तासांच्या कालावधीत अग्निशमन दलाकडे आगीच्या ४८ वर्दींची नोंद झाली. शहरातील झाडे, गवत, कचरा, घरांच्या गॅलरी, इमारतींचे टेरेस, दुकाने आणि गोदामांना आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Fire
GST Council Recommendations 2026: जीएसटी करचुकवेगिरी प्रकरणांत अटकेची भीती कमी होणार? अटक अधिकार काढण्याची परिषदेची शिफारस

फटाक्यांची ठिणगी पडल्याने कोंढवा येथील कडनगर चौकातील पडीक इमारतीच्या बेसमेंटमधील साहित्याला आग लागली. धायरीतील डीएसके विश्व परिसरातील मोकळ्या मैदानातील गवत, शिवाजीनगरमधील शिरोळे रस्त्यावरील झाड आणि काशेवाडीतील हरकानगर परिसरातील कचऱ्याने पेट घेतला.

Fire
Pune Underground Tunnel Project: पुण्यात वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ३१ किमीचे दोन भुयारी मार्ग! भोसरी-उंड्री आणि भूगाव-एरंडवणे जोडणार

सायंकाळनंतर आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली. सदाशिव पेठेतील नागनाथ पार, वडगाव बुद्रुक, कात्रज, सातारा रस्ता, सिंहगड रस्ता, कोथरूड, नाना पेठ, भवानी पेठ, खराडी, टिंगरेनगर, शुक्रवार पेठ, गंज पेठ, पाषाण आणि वारजे परिसरात आगीच्या घटना घडल्या.

Fire
Pune Temperature: पुण्यात थंडीची चाहूल! एनडीए परिसरात पारा १२.६ अंशांवर; यंदाच्या हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद

काही ठिकाणी इमारतींच्या गॅलरी आणि फ्लॅटमध्ये, तर काही ठिकाणी झाडे आणि मोकळ्या जागेतील गवताला आग लागली. फुरसुंगी येथील गोदामालाही आग लागली. आगीच्या घटनांची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी विविध ठिकाणी धाव घेतली. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी दलाकडून आवश्यक यंत्रणा तैनात करण्यात आली होती.

Fire
Jejuri Khandoba Somvati Yatra: जेजुरीच्या खंडोबाच्या सोमवती यात्रेत भंडाराची उधळण! ‘येळकोट येळकोट जय मल्हार’च्या जयघोषाने गड दुमदुमला

सिटीप्राईडजवळ फ्लेक्स प्रिंटिंग दुकानाला आग

सातारा रस्त्यावरील सिटीप्राईड चित्रपटगृहाजवळ सोनावणे इंडस्ट्रिज येथील फ्लेक्स प्रिंटिंग दुकानाला रात्री नऊच्या सुमारास आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या आणि एक टँकर घटनास्थळी दाखल झाले. जवानांकडून आग विझविण्याचे काम सुरू होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.