Pune Fruit Market Rates: पुण्यात डाळिंबाचे भाव १० टक्क्यांनी घसरले; खरबूज, पपईसह 'या' फळांना तेजी!

मार्केट यार्डात डाळिंबाची १०० ते १२० टन आवक; मागणी वाढल्याने सीताफळ, ड्रॅगन फ्रूट आणि बोरांचे दर वधारले
Pomegranate
PomegranatePudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: गुलटेकडी मार्केट यार्डातील घाऊक फळबाजारात रविवारी डाळिंबाची आवक वाढल्याने भावात दहा टक्क्यांनी घसरण झाली. दुसरीकडे, मागणी वाढल्याने खरबूज, पपई, सीताफळ, ड्रॅगन फ्रूट आणि बोरांच्या भावात वाढ झाली. मागणी आणि पुरवठ्यातील समतोलामुळे उर्वरित फळांचे दर मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर राहिले. बाजारात विविध फळांची आवक सुरू असून, मागणी आणि आवकेतील चढ-उतारांचा परिणाम फळांच्या दरांवर होत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

Pomegranate
Pune Grape Market: पुण्याच्या बाजारात नव्या हंगामातील द्राक्षांची एंट्री; ‘तास-ए-गणेश’ला १२०० रुपये दर!

मार्केट यार्डातील फळबाजारात रविवारी लिंबाची ८०० ते १००० गोणी, मोसंबीची ४० ते ५० टन, संत्र्याची ५० ते ५५ टन, डाळिंबाची १०० ते १२० टन, पपईची १० ते १२ टेम्पो, कलिंगडाच्या ८ ते १० गाड्या, खरबुजाचे ९ ते १० टेम्पो, चिक्कूची दोन हजार डाग, पेरूची दीड ते दोन हजार क्रेट, सीताफळाची ७ ते ८ टन, ड्रॅगन फ्रूटची ८ ते १० टन, सफरचंदाच्या ४ ते ५ हजार पेट्या, तर अननसाची ६ ट्रक आवक झाली.

Pomegranate
Pune Fish Market Rates: दिवाळीनंतर पुणेकरांचा मांसाहारावर ताव; मासळीचे दर कडाडले!

फळांचे घाऊक भाव (रुपयांत) :

लिंबू (प्रतिगोणी) : ३०० ते १६००, मोसंबी (३ डझन) : १६० ते ३५०, मोसंबी (४ डझन) : ६० ते १८०, संत्रा (१० किलो) : १५० ते ७००, डाळिंब (प्रतिकिलो) : भगवा १०० ते २८०, आरक्ता ६० ते ९०, गणेश १५ ते ४०, कलिंगड (प्रतिकिलो) : ८ ते १५, खरबूज (प्रतिकिलो) : १५ ते ४५, पपई (प्रतिकिलो) : १२ ते ३०,

Pomegranate
AISHE Survey 2025 26: राज्यातील महाविद्यालयांना एआयएसएचई सर्वेक्षण बंधनकारक; माहिती भरण्यासाठी १० डिसेंबरची अंतिम मुदत

चिक्कू (१० किलो) : १०० ते ६००, पेरू (२० किलो) : २०० ते ५००, अननस (एक डझन) : ३०० ते ९००, सीताफळ (प्रतिकिलो) : २० ते १३०, ड्रॅगन फ्रूट (प्रतिकिलो) : २० ते १५०, बोरे (१० किलो) चमेली : ४५० ते ५००, उंबरान : १८० ते २२०, चेकनट : ११०० ते १२००, चण्यामण्या : ८०० ते ९००, काश्मीर डेलिशियस सफरचंद (१५ ते १६ किलो) : १२०० ते १८००, किन्नोर सफरचंद (२० ते २५ किलो) : ४००० ते ४५००.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.