Pune Fish Market Rates: दिवाळीनंतर पुणेकरांचा मांसाहारावर ताव; मासळीचे दर कडाडले!

मासळीची आवक दुप्पट होऊनही मागणी कायम; मटण, चिकन आणि अंड्यांचे दर स्थिर
Fish
Fish Pudhari File Photo
Published on: 
Updated on: 

पुणे: दिवाळी पाडव्यानंतर पुणेकरांचा मांसाहाराकडे कल वाढल्याने मासळी, मटण आणि चिकनला मागणी वाढली आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत मासळीची आवक दुप्पट झाली असली, तरी मागणी अधिक असल्याने मासळीचे दर तेजीत आहेत. दुसरीकडे, मागणीच्या तुलनेत पुरेसा पुरवठा होत असल्याने मटण, चिकन आणि अंड्यांचे भाव स्थिर आहेत.

Fish
AISHE Survey 2025 26: राज्यातील महाविद्यालयांना एआयएसएचई सर्वेक्षण बंधनकारक; माहिती भरण्यासाठी १० डिसेंबरची अंतिम मुदत

गणेश पेठ येथील घाऊक बाजारात रविवारी (दि. १५) खोल समुद्रातील मासळी १५ ते २० टन, खाडीच्या मासळीची २०० ते २५० किलो आणि नदीच्या मासळीची ४०० ते ५०० किलो इतकी आवक झाली. तर आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची मिळून १५ ते २० टन आवक झाली.

Fish
PMPML Special Bus Service: पुणे-पिंपरीतील औद्योगिक कामगारांसाठी पीएमपीच्या तीन शिफ्टमध्ये विशेष बससेवा

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर):

पापलेट : कापरी : १६००-२४००, मोठे : १५००-१८००, मध्यम : १३००-१५००, लहान : ९००-११००, भिला : ७००-८००, हलवा : ७००-८००, सुरमई ७००-१२००, रावस : ७००-१०००, घोळ : ८००, करली : २५०-३५०, भिंग : ३००-३५०, पाला : १०००-१५००, वाम : पिवळी ७००-१०००, काळी : ३५०-५५०, ओले बोंबील : २००-३००.

Fish
NCP Merger: राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा निर्णय सुनेत्रा पवार यांच्या भूमिकेवर अवलंबून; छगन भुजबळ यांचे विधान

कोळंबी : लहान : १६०-२५०, मध्यम : ३००-५००, मोठी : ५५०-७००, जम्बो प्रॉन्स : १०००-१२००, किंग प्रॉन्स : ८००, लॉबस्टर : २०००-२४००, मोरी : ३००-४००, मांदेली : १००-१४०, राणीमासा : २४०-२८०, खेकडे : ३५०-४५०, चिंबोर्‍या : ७००-७५०. खाडीची मासळी - सौंदाळे : ३००-३५०, खापी : २५०-३००, नगली : ३००-४००, तांबोशी : ४००-५००, पालू : ३५०-४००, लेपा : ३००-३५०, बांगडा : २००-२८०, शेवटे : २५०-३००, बेळुंजी : १२०-१८०, तिसर्‍या : २५०-३००, खुबे : १००-१५० तारली : २००-२५०.

Fish
Pune Theatre Rent Hike: पुण्यातील महापालिका नाट्यगृहांचे भाडे दुप्पट होणार? १३ वर्षांनंतर भाडेवाढीचा प्रस्ताव

नदीतील मासळी : रहू : १४०-१८०, कतला : १६०-२००, मरळ : ३५०-४००, शिवडा : १८०-२२०, खवली : २००-२५०, आम्ळी : १२०-१६०, खेकडे : २५०-४००, वाम : ३५०-४५०. मटण : बोकडाचे ८८०, बोलाईचे ८८०, खिमा ८८०, कलेजी ९२०. चिकन २५०, लेगपीस ३००, जिवंत कोंबडी १७०, बोनलेस ३५०. अंडी : गावरान (शेकडा) १२७० डझन १५६, प्रतिनग १३. इंग्लिश (शेकडा) ७०५, डझन ९६, प्रतिनग ८.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.