

पुणे : कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात यंदा जुलै महिन्यात 16 वन्यप्राण्यांचा मृत्यू झाला, तसेच गेल्या वर्षीही 29 प्राण्यांचा मृत्यू ओढवला होता. त्यात विविध प्रकारच्या 14 हरणांचा समावेश होता. यातील बहुतांश हरणे ट्रॉमॅटिक शॉकने दगावली होती, तर उर्वरितांमध्ये सरपटणारे प्राण्यांसह पक्षी, अन्य प्राण्यांचा समावेश आहे.
राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात पाच-सहा दिवसांपूर्वी दगावलेल्या 16 हरणांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी गेल्या वर्षी दगावलेली बहुतांश हरणे ही ट्रॉमॅटिक शॉकने (अत्यंत क्लेशकारक धक्का) मृत्युमुखी पडली होती, असा निष्कर्ष राष्ट्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या अहवालातून (सन 2023-24) समोर आला आहे. यंदा घडलेल्या चितळांच्या मृत्यूबाबतही असे काही घडले आहे का, याची तपासणी प्राणिसंग्रहालय प्रशासनाकडून केली जात आहे.
राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातील 16 चितळांचा मृत्यू अवघ्या पाच ते सहा दिवसांत झाला. या घटनेला 5 दिवस झाले आहेत. प्राणिसंग्रहालय प्रशासनाने त्यांचे जैविक नमुने तपासणीसाठी 05 महत्त्वाच्या प्रयोगशाळांना पाठवले आहेत. त्यांचा मृत्यू कशामुळे झाला, त्यामागे काय कारण होते, असे प्रश्न पुणेकरांना पडलेले आहेत.
अक्र . हरणांचा प्रकार - संख्या
1) चितळ (स्पॉटेड डिअर) - 03
2) भेकर (बार्किंग डिअर) - 03
3) चिंकारा - 01
4) काळवीट - 06
5) सांबर - 01
6) रानमांजर - 02
7) मोठी खार (जायंट क्विरल) - 01
एकूण - 17
2023-24 मध्ये मृत्यू पावलेले विविध पक्षी-प्राणी
विविध प्रकारांतील पक्षी - 05
सस्तन प्रकारातील प्राणी - 17
सरपटणारे प्राणी - 07
प्राणिसंग्रहालयात सन 2023-24 मध्ये मृत्यू झालेले एकूण प्राणी - 29
मृत्यू झालेले प्राणी...
नर - 17
मादी -12
एकूण - 29