Rajgurunagar Iron Rod Attack: राजगुरुनगरमध्ये लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला; खेड पोलिसांत गुन्हा

मोबाईल फोटो व्हायरल केल्याच्या रागातून मारहाण; आरोपीविरुद्ध बीएनएस कलमान्वये कारवाई
Iron Rod
Iron RodPudhari
Published on
Updated on

राजगुरुनगर: एका खासगी कंपनीतील नोकरदारावर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे.अक्षय भगवान भांबुरे , (रा. ढोरे भांबुरवाडी, ता. खेड) याने हा हल्ला केला असून विशाल हिरामण तोत्रे या हल्ल्यात जखमी झाला आहे. राक्षेवाडी , (ता. खेड) येथे रविवारी (दि. २२) घडलेल्या या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Iron Rod
Pune PCPNDT Online System: पुण्यात ‘पीसीपीएनडीटी’ ऑनलाइन प्रणाली कागदावरच; डॉक्टरांची अंमलबजावणीची मागणी

फिर्यादी विशाल तोत्रे यांच्या तक्रारीत नमुद केल्या नुसार आरोपी कंपनीत मोबाईल फोन वापरत असल्याचा फोटो तोत्रे कंपनीच्या मॅनेजरला आणि व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल केल्याबद्दल राग आला होता. याच रागातून आरोपीने हातातील लोखंडी रॉडने फिर्यादीच्या डोक्यावर दोन फटके मारले, डाव्या हाताच्या कोपऱ्यावर मारहाण केली, ज्यामुळे गंभीर दुखापत झाली. तसेच, "यापुढे तक्रार केलीस तर जिवे मारून टाकीन" अशी धमकी दिली आणि शिवीगाळ करून दमदाटी केली.

Iron Rod
Pune MahaRERA Recovery Warrants: पुण्यात १४६ कोटींची ‘महारेरा’ वसुली प्रलंबित; जिल्हाधिकाऱ्यांचे कडक निर्देश

या गुन्ह्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ११८(१)(२) (धोकादायक शस्त्राने जखम करणे), ३५१(२)(३) (धमकी देणे), ३५२ (हल्ला किंवा गुन्हेगारी बलप्रयोग) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुभाष चव्हाण यांनी दिली. फिर्यादीवर वैद्यकीय उपचार सुरू असून, पोलिसांनी आरोपी अक्षय भांबुरे याच्या शोधासाठी तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, स्थानिक नागरिकांनी कायद्याची कठोर अंमलबजावणीची मागणी केली आहे. पोलिसांनी या प्रकरणात लवकरात लवकर आरोपीला अटक करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news