Tinhewadi News: राजगुरुनगरमध्ये स्व. अजित पवार यांच्या अस्थिकलश रथाचे भावनिक स्वागत

तिन्हेवाडीत ग्रामस्थ, विद्यार्थी व कार्यकर्त्यांकडून अश्रूंनी श्रद्धांजली; अजितदादांच्या स्मृतींना उजाळा
Ajit Pawar Asthikalash Yatra
Ajit Pawar Asthikalash YatraPudhari
Published on
Updated on

राजगुरुनगर: तिन्हेवाडी, (ता. खेड) येथे बुधवारी (दि. ४) स्व. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अस्थिकलश रथाचे भावनिक वातावरणात आगमन झाले. वाफगाव - रेटवडी गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार अश्विनीताई राजूशेठ पाचारणे यांच्या हस्ते अस्थिकलशाचे पूजन करण्यात आले.

Ajit Pawar Asthikalash Yatra
Pune Bharat Rang Mahotsav: पुण्यात भारत रंग महोत्सव 2026; एफटीआयआयमध्ये रंगणार आंतरराष्ट्रीय नाट्यपर्व

या वेळी शालेय विद्यार्थी, ग्रामस्थ आणि पक्ष कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन दर्शन घेतले आणि श्रद्धांजली वाहिली. अश्विनीताई पाचारणे यांच्या नेतृत्वाखाली वाफगाव - रेटवडी जिल्हा परिषद गटातील अनेक गावात अस्थिकलश रथ नेण्यात आला. गावोगावच्या नागरिकांनी गर्दी करून कलशाचे पूजन करून अभिवादन केले. तिन्हेवाडी परिसरात यावेळी भावनिक वातावरण निर्माण झाले होते. अनेकांनी अश्रू ढाळत अजितदादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. अस्थिकलश रथाचे आगमन झाल्यानंतर उपस्थित नागरिकांनी दर्शनासाठी आवर्जुन उपस्थिती लावली.

Ajit Pawar Asthikalash Yatra
Pune Viral Video: कोयत्याने वार, बघ्यांची गर्दी... तो गयावया करत होता, पण...;पुण्यातील धक्कादायक घटना

पक्षाचे जिल्हा युवक अध्यक्ष निलेश थिगळे, रेटवडी पंचायत समिती गणाचे उमेदवार प्रा. बापू चौधरी, महेंद्र वरकड, ग्रामपंचायत सदस्य प्रियांकाताई पाचारणे, माजी उपसरपंच सीमाताई आरुडे, पांडुरंग गायकवाड, संतोष नाना पाचारणे आदी मान्यवर व नागरिक यावेळी उपस्थित होते. सर्वांनी एकत्र येऊन अजित पवार यांच्या स्मृतीला अभिवादन केले. स्व. अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या अस्थिकलशाची महाराष्ट्रभर यात्रा सुरू आहे. विविध जिल्हे आणि गावांमध्ये अस्थिकलश रथ नेले जात असून, लाखो कार्यकर्ते आणि नागरिक भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहेत. तिन्हेवाडीतील हा कार्यक्रमही त्याच श्रद्धांजली यात्रेचा एक भाग होता.

Ajit Pawar Asthikalash Yatra
Shehzad Poonawalla Mother Hit And Run: भाजपच्या शेहजाद पूनावाला यांच्या आईच्या अंगावर गाडी घातली... पुण्यातील धक्कादायक प्रकार

राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी या कार्यक्रमाचे आयोजन भावपूर्ण पद्धतीने केले. अजितदादांच्या विकासकामांचे स्मरण करत सर्वांनी त्यांच्या विचारांना पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला. अजितदादा अमर रहेच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. महाराष्ट्राच्या राजकारणातील एका दिग्गज नेत्याला आजही जनतेतून मोठ्या प्रमाणात प्रेम आणि आदर मिळत आहे. तिन्हेवाडीतील या भावनिक क्षणांनी ते पुन्हा एकदा सिद्ध झाले.

Ajit Pawar Asthikalash Yatra
Khadakwasla Green Park: खडकवासला धरणतीरावर दहा हजार वृक्षांचा हरित पार्क; खानापूरमध्ये शेत रस्त्याचीही निर्मिती

कामाचा माणूस आणि आम्हा बहिणींचा लाडका भाऊ नाही हे खुप मोठे दुःख आहे.दादांच्या दुर्दैवी घटनेने महाराष्ट्र, पुणे जिल्ह्याच्या राजकारणात अंधःकार पसरला आहे.आदरणीय अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील काळात कार्यरत राहणार आहे.

अश्विनीताई राजूशेठ पाचारणे,उपाध्यक्षा राजगुरुनगर सहकारी बँक.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news