Pune Bharat Rang Mahotsav: पुण्यात भारत रंग महोत्सव 2026; एफटीआयआयमध्ये रंगणार आंतरराष्ट्रीय नाट्यपर्व

एनएसडीच्या 25 व्या भारत रंग महोत्सवात ‘लैला मजनू’, ‘बाबूजी’ आणि ‘ताजमहाल का टेंडर’ नाट्यप्रयोग
Drama
DramaPudhari
Published on
Updated on

पुणे: महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात गुरुवार (दि. 5) ते शनिवार (दि. 7) दरम्यान नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या (एनएसडी) वतीने 25 वा ‌‘भारत रंग महोत्सव 2026 (बीआरएम)‌’ हा आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सव आयोजित केला आहे.

Drama
Pune Viral Video: कोयत्याने वार, बघ्यांची गर्दी... तो गयावया करत होता, पण...;पुण्यातील धक्कादायक घटना

विधी महाविद्यालय रस्त्यावरील फिल्म ॲण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) सभागृहात हा महोत्सव रंगणार आहे. महोत्सवात एनएसडी रेपर्टरी कंपनीची विविध विषयांवरील नाटके पाहायला मिळणार आहेत.

Drama
Shehzad Poonawalla Mother Hit And Run: भाजपच्या शेहजाद पूनावाला यांच्या आईच्या अंगावर गाडी घातली... पुण्यातील धक्कादायक प्रकार

पुण्यातील भारत रंग महोत्सवाची सुरुवात गुरुवारी (दि. 5) इस्माईल चुनारा लिखित आणि राम गोपाल बजाज दिग्दर्शित ‌‘लैला मजनू‌’ या नाटकाने होईल. त्यानंतर शुक्रवारी (दि. 6) मिथिलेश्वर लिखित आणि राजेश सिंग दिग्दर्शित बाबूजी हे नाटक पाहायला मिळणार आहे.

Drama
Khadakwasla Green Park: खडकवासला धरणतीरावर दहा हजार वृक्षांचा हरित पार्क; खानापूरमध्ये शेत रस्त्याचीही निर्मिती

तर पुण्याच्या भारत रंग महोत्सवाचा समारोप शनिवारी (दि.7) अजय शुक्ला लिखित आणि चित्तरंजन त्रिपाठी दिग्दर्शित ‌‘ताजमहाल का टेंडर‌’ या नाटकाचे होणार आहे. भारत रंग महोत्सव 2026 सर्व राज्यांमध्ये विविध ठिकाणी साजरा केला जात आहे. एनएसडीद्वारे आयोजित भारत रंग महोत्सव हा जगातील सर्वात मोठा नाट्य महोत्सव आहे.

Drama
Ajit Pawar Cooperative Sector Contribution: सहकार क्षेत्रातील अजित पवारांचे योगदान अमूल्य; जिल्हा बँकेच्या प्रगतीचे श्रेय त्यांच्या नेतृत्वाला

या महोत्सवाची 25 वी आवृत्ती 27 जानेवारी ते 20 फेबुवारीपर्यंत 25 दिवस चालेल, ज्यामध्ये विविध सादरीकरणे पाहायला मिळणार आहेत, असे एनएसडीतर्फे प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगण्यात आले. महोत्सवाविषयी एनएसडीचे संचालक चित्तरंजन त्रिपाठी म्हणाले, एनएसडी आणि एफटीआयआयने एकत्र येऊन पुण्यात भारत रंग महोत्सव 2026 आयोजित केला आहे, याचा आनंद आहे. पुण्यातील भारत रंग महोत्सव 2025 हा रंगभूमी आणि चित्रपटाचा एक सुंदर संगम ठरला होता. एफटीआयआयसोबत आणखी उपक्रम राबविणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news