Pune Nagar Road Traffic Jam: नगर रस्त्यावर मेट्रोचे बॅरिकेड्स अन् बेशिस्त पार्किंग; रामवाडी ते पाचवा मैल वाहतूक कोंडीत

माती परीक्षणामुळे रस्ता अरुंद; फुटपाथ, सायकल ट्रॅकवरही वाहनांचे अतिक्रमण, नियमित कारवाईची नागरिकांची मागणी
Pune Nagar Road Traffic Jam
Pune Nagar Road Traffic JamPudhari
Published on: 
Updated on: 

वडगाव शेरी: नगर रस्त्यावर रामवाडी ते वाघोली मेट्रोच्या कामासाठी ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावून माती परीक्षण सुरू असल्याने वाहतुकीसाठी हा रस्ता अरुंद झाला आहे. त्यातच येरवडा ते खराडी दर्गा रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात अनधिकृत पार्किंग होत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.

Pune Nagar Road Traffic Jam
Pune Rose Flower Exhibition: पुण्यात रंगली गुलाबांची रंगतदार दुनिया; ५०० हून अधिक गुलाबपुष्पांचे प्रदर्शन

त्यामुळे सकाळी आणि सायंकाळी या मार्गावरील वाहतूक संथ होऊन कोंडी होत आहे. बेशिस्तपणे वाहने पार्क करणार्‍यांवर नियमित कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. रामवाडी ते वाघोली मेट्रोच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असून, त्यापूर्वी मेट्रो प्रशासनाकडून माती परीक्षणाचे काम सुरू आहे. यासाठी रस्त्याच्या मध्यभागी बॅरिकेड्स लावण्यात आल्याने वाहतुकीसाठी उपलब्ध जागा कमी झाली आहे.

Pune Nagar Road Traffic Jam
Pune Municipal Corporation Flying Squads: पुणे महापालिकेच्या ‘भरारी पथकां’चा उद्देशच भरकटला; कचऱ्यावर कारवाईऐवजी बैठका, पाहणीसाठी वाहने

रामवाडीतील सत्यम आर्केड, छत्रपती संभाजी महाराज चौक, पाचवा मैल ते ई-स्पेस, मंत्री मार्केट, खराडी बायपास आणि चंदननगर बाजारपेठ परिसरात हॉटेल, दुकाने व बाजारपेठेत येणारे नागरिक रस्त्याच्या कडेला वाहने पार्क करून जातात. फ्लोअर पॉइंट ते मंत्री आयटी पार्कदरम्यान फुटपाथवर चारचाकी व दुचाकी वाहने पार्क केली जात असल्याने पादचार्‍यांना रस्त्यावरून चालावे लागत आहे.

Pune Nagar Road Traffic Jam
Ganadhish Navonmesh Competition: ‘गणाधीश नवोन्मेष स्पर्धे’चा जल्लोषात पारितोषिक वितरण सोहळा; नटरंग ॲकॅडमीच्या कलाकारांनी रंगवली सांस्कृतिक मैफल

तसेच, सायकल ट्रॅकवरही अतिक्रमण झाल्याने सायकलस्वारांना रस्त्यावरून मार्गक्रमण करावे लागत आहे. रस्त्यावरील पार्किंग आणि मेट्रोच्या कामासाठी लावलेले बॅरिकेड्स यामुळे नगर रस्त्यावरील वाहतुकीचा वेग मंदावला आहे. यू-टर्नच्या ठिकाणी काही वाहनचालक विरुद्ध दिशेने वाहने चालवत असल्याने किरकोळ अपघातांसह वाहतूक कोंडीच्या घटना घडत आहेत. विशेषतः सकाळी व सायंकाळच्या गर्दीच्या वेळी रामवाडी ते पाचवा मैल या मार्गावर कोंडीची समस्या गंभीर होत आहे.

Pune Nagar Road Traffic Jam
Pune MPSC Students Protest: पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनात फूट; शास्त्री रस्ता अन् एस. एम. जोशी पुलावर ठिय्या

वाहतूक पोलिसांची उपस्थिती कमी

नगर रस्त्यावरील प्रमुख चौकांमध्ये पूर्वी वाहतूक पोलिसांची नियमित उपस्थिती दिसत होती. मात्र, यू-टर्नचा प्रयोग सुरू झाल्यापासून वाहतूक पोलिसांची उपस्थिती कमी झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे काही वाहनचालक विरुद्ध दिशेने वाहने चालवत आहेत. तसेच, बेशिस्त पार्किंगवर नियमित कारवाई होत नसल्याने समस्या वाढत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.

अवैध पार्किंगवर कारवाईची गरज

सामाजिक कार्यकर्ते श्रीधर गलांडे म्हणाले की, नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर झाला आहे. रस्त्यावर वाहने पार्क करणार्‍यांवर वाहतूक पोलिसांनी नियमित कारवाई करण्याची गरज आहे. दुकानदारांच्या समोरील वाहनांवर कारवाई केली जात नाही; मात्र अन्य ठिकाणी वाहन पार्क केल्यास तत्काळ कारवाई केली जाते. तसेच, सायंकाळच्या वेळी खासगी बस नगर रस्त्यावर पार्क केल्या जात असल्याने कोंडीत भर पडते. वाहतूक पोलिसांनी नियमित कारवाई करून अवैध पार्किंगला आळा घालावा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news