Fursungi Water Supply Fee: आठवड्यातून तीन दिवस पाणी; तरी फ्लॅटमागे दोन हजारांचे शुल्क, फुरसुंगीतील रहिवाशांचा सवाल

चौरंग टेरेस सोसायटीतील पाणीपट्टीच्या आकारणीवर प्रश्नचिन्ह; शुल्काची गणना व नियम स्पष्ट करण्याची नगर परिषदेकडे मागणी
Water Supply
Water SupplyPudhari
Published on: 
Updated on: 

फुरसुंगी: फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपरिषद हद्दीतील चौरंग टेरेस सोसायटीमध्ये 'सार्वजनिक नळ कोंडळ प्रकल्पा'अंतर्गत सामाईक पाणी पुरवठ्यासाठी प्रत्येक फ्लॅटकडून तब्बल दोन हजार रुपये शुल्क आकारण्यात आल्याचा मुद्दा सध्या चर्चेत आला आहे. आठवड्यातून केवळ तीन दिवस आणि साधारण एक तास पाणीपुरवठा होत असताना हे शुल्क कोणत्या आधारावर आकारण्यात आले, असा सवाल रहिवाशांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

Water Supply
Otur Crime: ओतूरमध्ये ११ वर्षीय मुलीशी गैरवर्तनाचा आरोप; किराणा दुकानदाराला अटक

रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, सोसायटीमध्ये नियमित व पुरेसा पाणीपुरवठा होत नसताना प्रत्येक फ्लॅटकडून दोन हजार रुपये शुल्काची आकारणी करण्यात आली आहे. त्यामुळे या शुल्काची आकारणी कोणत्या नियम, आदेश किंवा निकषानुसार करण्यात आली, याबाबत नगर परिषद प्रशासनाने स्पष्टता द्यावी, अशी मागणी होत आहे.

Water Supply
Pune Nagar Road Traffic Jam: नगर रस्त्यावर मेट्रोचे बॅरिकेड्स अन् बेशिस्त पार्किंग; रामवाडी ते पाचवा मैल वाहतूक कोंडीत

प्रत्येक घराला स्वतंत्र नळ कनेक्शन देण्यात आले असेल आणि ते नगर परिषदेच्या अधिकृत पाणीपुरवठा व्यवस्थेअंतर्गत असेल, तर नियमानुसार पाणीपट्टी आकारणी करण्याची तरतूद असू शकते. मात्र, त्यासाठी आकारण्यात येणारे शुल्क, त्याची गणना आणि लागू असलेले नियम नागरिकांना स्पष्टपणे कळविणे आवश्यक असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.

Water Supply
Pune Rose Flower Exhibition: पुण्यात रंगली गुलाबांची रंगतदार दुनिया; ५०० हून अधिक गुलाबपुष्पांचे प्रदर्शन

दरम्यान, सातववाडी-गोंधळेनगर परिसरात काही वर्षांपूर्वी अशाच पद्धतीने पाणीपट्टी आकारण्यात आली होती. त्या वेळी नागरिकांनी आक्षेप घेतल्यानंतर संबंधित पाणीपट्टी कमी करण्यात आली होती, असा दाखला रहिवाशांकडून देण्यात येत आहे.

Water Supply
Pune Municipal Corporation Flying Squads: पुणे महापालिकेच्या ‘भरारी पथकां’चा उद्देशच भरकटला; कचऱ्यावर कारवाईऐवजी बैठका, पाहणीसाठी वाहने

चौरंग टेरेस सोसायटीतील पाणीपुरवठ्याचे प्रत्यक्ष प्रमाण, प्रत्येक कनेक्शनचा प्रकार, पाणीपट्टीचा अधिकृत दर आणि दोन हजार रुपये शुल्काची नेमकी गणना याबाबत नगरपरिषद प्रशासनाने माहिती जाहीर करावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. त्यामुळे पाणी किती मिळते आणि त्यासाठी शुल्क किती आकारले जाते, याचा ताळमेळ प्रशासनाने स्पष्ट करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news