मुळशीत विजांच्या कडकडाटासह पाऊस

मुळशीत विजांच्या कडकडाटासह पाऊस
Published on
Updated on

पौड; पुढारी वृत्तसेवा : मुळशी तालुक्यात मंगळवारी (दि.7) पहाटे तीननंतर अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. पावसामुळे आंबा पिकाला फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. झाडाला आलेला मोहोर अनेक ठिकाणी गळून पडला आहे.
मुळशी तालुक्यात सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. दिवसभर नागरिक उकाड्याने हैराण झाले होते. भूगाव, पिरंगुट परिसरात सोमवारी सायंकाळीच हलक्या स्वरूपात पाऊस पडला.

अनेक ठिकाणी होळीचे पूजन व दहन उत्साहात पार पडले. मात्र, पहाटे तीननंतर जोरदार विजेचा कडकडाट सुरू झाला. यानंतर पावसानेही सुरुवात केली. मुळशी तालुक्यात आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. मात्र, दर वर्षीप्रमाणे याही वर्षी ढगाळ वातावरण आणि अवकाळीने मोहोर गळून पडण्यास सुरुवात झाली आहे. परिणामी, आंबा उत्पादक चिंतेत सापडला आहे. पावसाने वांगी, टोमॅटो, तसेच इतर पिकांनाही फटका बसणार आहे.

कडकडाटामुळे सगळेच जागे
मंगळवारी पहाटे पौड परिसरात विजेचा जोरदार कडकडाट सुरू होता. याच दरम्यान एकदा वीज जोरदार कडाडल्याने युनियन बँकेचे सुरक्षा सायरन आपोआपच जोरदार वाजू लागले. तसेच अनेक चारचाकी गाड्याचे सेंटर लाँकही आपोआपच वाजू लागले. परिणामी, पहाटे पाचनंतर नागरिक भयभीत होऊन जवळजवळ सगळेच जण जागे राहिले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news