

पुणे : राज्यात उद्यापासून (दि.9) पुन्हा पावसाला सुरूवात होणार आहे. राज्यातील 36 पैकी 23 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकण वगळता प्रामुख्याने विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात दमदार पावसाची शक्यता आहे.
मान्सून 26 मे पासून मुंबई, पुणे आणि अहिल्यानगर येथे मुक्कामी आहे. त्यामुळे या भागात पाऊस सुरू आहे. मात्र तो 12 जून नंतर राज्यातील इतर भागात पुढे जाईल, असा अंदाज आहे. दरम्यान राज्यातील 23 जिल्ह्यांत सोमवारपासून पाऊस सुरु होत असून विजांच्या कडकडाटासह दमदार पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
रत्नागिरी (9), सिंधुदुर्ग (9,12), अहिल्यानगर (8,9),पुणे (8), सातारा(9),सांगली (8,12),सोलापूर (9 ते 12), नांदेड (9,12), लातूर (11,12), धाराशिव (9 ते 12), अकोला( 12), अमरावती (11,12), भंडारा (11,12), बुलडाणा (12), चंद्रपूर (11,12), गडचिरोली (11,12), गोंदिया (11,12), नागपूर (11,12), वर्धा (11,12), वाशिम (12), यवतमाळ (11,12)