

पुणे : शहरात गत तीन दिवसांपासून मान्सून जोरदार बरसत आहे.मान्सून हंगामातील तिसरा मोठा शुक्रवारी शहरात झाला.सर्वाधिक पाऊस लोहगाव परिसरात 39.8 तर शिवाजीनगर भागात 15.2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली.मुसळधार पावसाने रस्त्यांना पूर आला होता त्यामुळे वाहनधारकांची चांगलीच तारांबळ उडाली.
शहरात शुक्रवारी सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत शहराच्या विविध भागात जोरदार पाऊस झाला मात्र पदमावती,कात्रज,पर्वती पायथा या भागात पाऊस झाला नाही. मात्र शिवाजीनगर, पाषाण, औंध, बाणेर, लोहगाव, नगररस्ता, खडकवासला, कोरेगावपार्क या भागात पाऊस झाला. शहराच्या मध्यभागात काही पेठांमध्ये पाऊस झाला. शिवाजी रस्त्यावरील मजुर अड्डा ते पासोड्या विठोबा मंदिर परिसरात जोरदार पाऊस झाला. तसेच रेल्वे स्थानक परिसरात पाणी साचल्याने प्रवाशांची तारांबळ झाली.
लोहगाव : 39.8
शिवाजीनगर : 15.2
पाषाण : 19.8
चिंचवड : 0.5
कोरेगाव पार्क : 0.5
एनडीए : 7.5
मान्सूनचा मुक्काम शहरात 26 मे पासून आहे.तो शहरातच अडखळल्याने गत तीन दिवसांपासून चांगला बरसतो आहे. शुक्रवारी शहरातील काही भागात मुसळधार पाऊस झाला. आगामी 72 तास पुन्हा शहरात मुसळधार पावसाची शक्यता असून तीन दिवस येलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे.