पिंपरी : रेल्वे प्रवाशांसाठी रेलवायर वाय-फाय सुविधा

पिंपरी : रेल्वे प्रवाशांसाठी रेलवायर वाय-फाय सुविधा
Published on
Updated on

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहराची स्मार्ट सिटी म्हणून ओळख आहे. मात्र आता स्मार्ट सिटीमधील रेल्वे स्थानकात प्रवाशांसाठी रेलवायर वाय-फाय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रवाशांना या सुविधेद्वारे वापर हा हायडिफेनेशन व्हिडी, पाहणे, विविध चित्रपट सहज डाऊनलोड करणे, ऑनलाइन गेम खेळणे, गाणे डाऊनलोड करणे यासह इंटरनेटद्वारे ऑफिसची कामेदेखील करू शकता. त्यामुळे शहरात प्रवासी यांचा लाभ घेताना पहायला मिळत आहे. ही वाय-फाय सेवा रेल्वे प्रवाशांसाठी बोनस ठरली आहे.

रेल्वे स्थानकात ही सुविधा मोफत असल्याने दररोज हजारो प्रवासी या सुविधेचा लाभ घेतात. रेलवायर या नावाने प्रवाशांसाठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामुळे प्रवाशांना रेल्वेत प्रवास करताना, प्लॅटफॉर्मवर आधिक वेळ थांबून प्रवासी याचा उत्तम प्रकारे लाभ घेत आहेत. रेल्वे स्थानकात चिंचवड, आकुर्डी, पिंपरी, अशा विविध रेल्वे स्थानकात वायफाय बसविलेले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news