Railway Job Fraud: रेल्वेत नोकरीचे आमिष; १४ लाखांची फसवणूक, तळेगाव ढमढेरे प्रकरण

शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथे रेल्वेत शासकीय नोकरी लावण्याचे आमिष दाखवून १४ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे
Job Fraud
Job FraudPudhari
Published on
Updated on

तळेगाव ढमढेरे: शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील एका महिलेच्या मुलाला रेल्वेमध्ये शासकीय नोकरी लावण्याचे आमिष दाखवून १४ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Job Fraud
Maharashtra Farm Loan Waiver Scheme: पुण्यात शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा मोठा अपडेट; १ लाखांहून अधिक कर्जदारांची नोंद

बाबूराव कृष्णा मदने व कृष्णा वसंत गावडे (दोघेही रा. पिंपरी-चिंचवड, पुणे; मूळ रा. भोगवली, ता. चंदगड, जि. कोल्हापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी कल्पना सूर्यकांत भुजबळ (वय ५२, रा. २४ वा मैल, तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Job Fraud
Monsoon Electrical Safety: पावसाळ्यात वीज अपघातांचा धोका वाढला; महावितरणकडून सतर्कतेचे आवाहन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बचत गटाच्या माध्यमातून कल्पना भुजबळ यांची बाबूराव मदने याच्याशी ओळख झाली होती. ऑगस्ट २०२४ मध्ये मदने याने त्यांच्या मुलाला रेल्वेमध्ये शासकीय नोकरी लावून देण्याचे आश्वासन देत त्यासाठी १८ लाख रुपये खर्च येईल तसेच टप्प्याटप्प्याने पैसे देता येतील, असे सांगितले. त्याने कृष्णा गावडे यांची 'आमचे साहेब' म्हणून ओळख करून देत त्यांच्याशीही फोनवरून संवाद घडवून आणला.

Job Fraud
Food Adulteration Highway Hotels: नसरापूर परिसरात हॉटेल्सवर भेसळ व नियमभंगाचा आरोप वाढला

यानंतर कल्पना भुजबळ यांनी नातेवाइकांकडून पैसे उधार घेऊन तसेच कर्ज काढून बाबूराव मदने व कृष्णा गावडे यांना वेळोवेळी रोख आणि ऑनलाइन पद्धतीने एकूण १८ लाख रुपये दिले. त्यानंतर दोघांनी त्यांच्या मुलाला तीन महिन्यांसाठी प्रशिक्षणाच्या नावाखाली कोलकाता येथे पाठविले.

Job Fraud
Pune Nashik Rail Route: पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे; मूळ खेड-आंबेगाव मार्ग कायम ठेवण्यासाठी राज्यस्तरावर हालचाली

डिसेंबर २०२४ मध्ये मुलगा परत आल्यानंतर लवकरच नियुक्तिपत्र मिळेल, असे सांगण्यात आले. मात्र, बराच कालावधी उलटल्यानंतरही कोणतीही प्रक्रिया न झाल्याने कल्पना भुजबळ यांनी दिलेले पैसे परत मागितले. त्या वेळी आरोपींनी चार लाख रुपये परत केले. मात्र, उर्वरित रक्कम देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस हवालदार अमोल चव्हाण करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news