Maharashtra Farm Loan Waiver Scheme: पुण्यात शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा मोठा अपडेट; १ लाखांहून अधिक कर्जदारांची नोंद

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’अंतर्गत पुणे जिल्हा बँकेने १,०८,३४१ थकीत कर्जदारांचा डेटा अपलोड केला असून वारस नोंद व आधार क्रमांकासाठी प्रशासनाचे आवाहन
Farmers loan waiver
Farmers Loan Waiver Pudhari
Published on
Updated on

पुणे: राज्य सरकारने 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना' जाहीर केली आहे. याद्वारे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, आत्मविश्वास वाढवणे आणि शेती क्षेत्राला नवसंजीवनी देण्यात येत आहे.

Farmers loan waiver
Monsoon Electrical Safety: पावसाळ्यात वीज अपघातांचा धोका वाढला; महावितरणकडून सतर्कतेचे आवाहन

या अनुषंगाने पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेने जिल्ह्यातील १ लाख ८३४१ थकीत कर्जदारांचा तपशील ऑनलाईन पोर्टलवर अपलोड केल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक (पुणे ग्रामीण) प्रकाश जगताप यांनी दिली आहे.

Farmers loan waiver
Food Adulteration Highway Hotels: नसरापूर परिसरात हॉटेल्सवर भेसळ व नियमभंगाचा आरोप वाढला

कर्जमुक्ती योजनेच्या प्रभावी, पारदर्शक अंमलबजावणी आणि वेळेत लाभ देण्यासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेला कर्जदारांचा तपशील पोटर्लवर माहिती अपलोड करण्याचे आवाहन केले होते. योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यातील ११३ शेतकरी पात्र असूनही मयत असल्याने व अशा शेतकऱ्यांची वारस नोंद न झाल्याने अशा खात्याची माहिती अपलोड करता आलेली नाही.

Farmers loan waiver
Pune Nashik Rail Route: पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे; मूळ खेड-आंबेगाव मार्ग कायम ठेवण्यासाठी राज्यस्तरावर हालचाली

तसेच २९ सभासद लाभ घेण्यास पात्र असूनही त्यांचे आधार क्रमांक उपलब्ध नसल्याने यांची माहिती पोर्टलवर अपलोड करता आलेली नाही. त्यामुळे मयत सभासदांच्या वारसांनी तातडीने वारस नोंद करून घ्यावी व आधार क्रमांक नसलेल्या सभासदांनी आधार क्रमांक उपलब्ध करून घ्यावा, जेणेकरून त्यांची महिती पोर्टलवर अपलोड करता येईल, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news