कवठे येमाईत दारू धंद्यांवर छापे ; लाखो रुपयांचे कच्चे रसायन नष्ट

कवठे येमाईत दारू धंद्यांवर छापे ; लाखो रुपयांचे कच्चे रसायन नष्ट

टाकळी हाजी : पुढारी वृत्तसेवा : कवठे येमाई (ता. शिरूर) येथील अवैध गावठी दारू गाळप (हातभट्टी) तसेच ताडी विक्री धंद्यांवर शिरूर पोलिसांनी शुक्रवारी (दि. 28) छापे टाकून लाखो रुपयांचा माल नष्ट केला. याप्रकरणी पोलिसांनी दोघांवर गुन्हे दाखल केले आहेत.
पोलिसांनी छापा टाकून गावठी दारूसाठी लागणारे 14 बॅरेलमधील 2 हजार 800 लिटर कच्चे रसायन (अंदाजे किंमत 1 लाख), 35 लिटर तयार दारू, 5 लिटर ताडी असा लाखोंचा माल जप्त करून जागीच नष्ट केला.

सूरज लालासाहेब झेंडे व सागर गडगुल यांच्यावर गुन्हे दखल करण्यात आले आहेत. ही कारवाई शिरूरचे पोलिस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर, पोलिस उपनिरीक्षक सुनील उगले, पोलिस अंमलदार धनंजय थेऊरकर, दीपक पवार, सुरेश नागलोत, सोनू तावरे, विशाल पालवे यांनी केली. तपास सहायक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर व पोलिस नाईक धनंजय थेऊरकर करत आहेत.

विशेष पथक स्थापन करून या प्रकारच्या कारवाया कायम सुरू ठेवल्या जाणार आहेत. अवैध दारू, ताडी धंदे याबाबतचे गुन्हे वारंवार करणार्‍या गुन्हेगारांवर एमपीडीएसारख्या प्रतिबंधक व तडीपारी/हद्दपारी अशा स्वरूपाच्या कडक कारवाया केल्या जाणार आहेत.
                                            – संजय जगताप, पोलिस निरीक्षक, शिरूर.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news