

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : रहाटणी येथील एका स्पा सेंटरवर छापा टाकत गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने दोन पीडित मुलींची सुटका केली. या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. ही कारवाई पोलिसांनी गुरुवारी (दि. 15) रहाटणी-शिवार चौकात केली. या प्रकरणी पोलिसांना एक महिला व रोहन विलास समुद्रे (34, रा.पिंपरी) याला अटक केली आहे.
आरोपी शिवार चौकात स्पा सेंटर चालवत होते. तेथे पीडितेकडून स्वतःच्या उपजीविकासाठी वेश्या व्यवसाय करवून घेत होते. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक करत दोन मुलींची सुटका केली आहे. तर, आरोपींवर वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक प्रदीप सिंग सिसोदे, पोलिस अंमलदार सुनील शिरसाठ, सुधा टोके, भगवंता मुठे, मारुती करचुंडे, गणेश कारोटे यांनी ही कारवाई केली.
हेही वाचा