Rabies vaccine: रेबीज प्रतिबंधक लसीचा साठा सर्व रुग्णालयांत ठेवण्याचे निर्देश; राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचा आदेश

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर सरकारी व खासगी रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालयांना लस व इम्युनोग्लोब्युलिन उपलब्ध ठेवण्याचे बंधन
Rabies vaccine
रेबीज लसींpudhari photo
Published on
Updated on

पुणे : भटक्या कुत्र्यांच्या चाव्यामुळे होणाऱ्या रेबीज आजाराचा धोका लक्षात घेता देशातील सर्व सरकारी व खासगी रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालयांनी रेबीज प्रतिबंधात्मक लस आणि रेबीज इम्युनोग्लोब्युलिनचा पुरेसा साठा कायमस्वरूपी उपलब्ध ठेवावा, असे निर्देश राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात दिलेल्या आदेशानंतर आयोगाने हे निर्देश जारी केले आहेत.

Rabies vaccine
Thapaling Yatra Khandoba: श्री थापलिंग यात्रेला उत्साहात प्रारंभ; पहिल्याच दिवशी एक लाख भाविकांनी घेतले खंडोबा देवाचे दर्शन

कुत्री किंवा इतर प्राण्यांच्या चाव्यांच्या रुग्णांना तत्काळ उपचार मिळावेत यासाठी रेबीज प्रतिबंधात्मक लस आणि इम्युनोग्लोब्युलीनचा साठा कधीही संपणार नाही, याची जबाबदारी संबंधित रुग्णालय व्यवस्थापनावर टाकण्यात आली आहे. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव आठ आठवड्यांच्या आत या आदेशांच्या अंमलबजावणीचा अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर करणार आहेत. रेबीज हा प्राणघातक आजार असून, वेळेत उपचार न झाल्यास मृत्यूचा धोका असतो. त्यामुळे या निर्देशांची अंमलबजावणी ही सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असल्याचे स्पष्ट केले आहे.

Rabies vaccine
Pargav Mango: पारगाव आंबेबागांमध्ये कैऱ्यांची आगळीवेगळी हंगामाची सुरुवात; यंदा लवकरच चाखता येणार आंब्याची चव

महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने याची दखल घेत शहरात सर्वेक्षण केले. यामध्ये दवाखान्यांसह शाळा, रुग्णालये, रेल्वेस्थानके, बसस्थानके तसेच इतर सार्वजनिक ठिकाणे मिळून 3 हजार 387 ठिकाणे आढळून आले आहेत. भटक्या कुत्र्यांच्या वाढता वावर आणि त्यातून होणाऱ्या चाव्यांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून याचिका दाखल केली होती. या प्रकरणात दिलेल्या निर्देशांची अंमलबजावणी करण्यासाठी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने सर्व वैद्यकीय संस्थांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत.

Rabies vaccine
Kalam Bhairavnath temple: खामुंडीतील श्री काळभैरवनाथचरणी भक्तिभावाची चिठ्ठी; दोन तरुणींची पोलिस भरतीची स्वप्नपूर्ती

रुग्णालय परिसर भटक्या कुर्त्यांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक ते कुंपण, भिंत अथवा प्रवेशद्वाराची व्यवस्था करणे बंधनकारक आहे. तसेच परिसरातील स्वच्छता आणि भटक्या प्राण्यांच्या नियंत्रणासाठी प्रत्येक संस्थेने नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, असेही नमूद करण्यात आले आहे. दर तिमाहीत परिसराची तपासणी करून कुत्र्यांचे आश्रयस्थान तयार होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Rabies vaccine
Women Commission visit Rotimala: राज्य महिला आयोगाने रोटी गावात साधला संवाद; जावळ प्रथेबाबत चर्चा

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार याबाबत राज्य शासनाने परिपत्रक महापालिकेला पाठवले असून, त्यानुसार सर्व काही तयारी करण्यात येत आहे. त्यानुसार शहरातील रुग्णालयांमध्ये रेबीज प्रतिबंधात्मक लस आणि इम्युनोग्लोब्युलिनचा साठा अनुक्रमे चार हजार व तीन हजार इतका पुरेसा आहे. महापालिकेच्या दवाखान्यांत श्वानदंशानंतर त्या देण्यात येतात.

डॉ. सारिका फुंडे, प्रमुख, पशुवैद्यकीय विभाग, महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news