Rabid Dog Attack Pune: पिसाळलेल्या कुत्र्याचा पाच मुलांना चावा; सिंहगड रस्ता परिसरातील पीएमएवाय सोसायटीत दहशत

पीएमएवाय सोसायटीत कुत्र्याची दिवसभर दहशत; महापालिकेच्या पथकाने रात्री उशिरा कुत्र्याला पकडले
Rabid Dog Attack Pune
Dog AttackPudhari
Published on
Updated on

पुणे : सिंहगड रस्ता परिसरातील पीएमएवाय सोसायटीत एका पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याने शनिवारी दिवसभर दहशत माजवली. या कुत्र्याने येथील पाच मुलांना चावा घेतला. तर, परिसरातील पाच भटक्या आणि दोन पाळीव कुर्त्यांवरही हल्ला केल्याची माहिती रहिवाशांनी दिली. या घटनेने परिसरातील नागरिक भयभीत झाले होते. रात्री उशिरा महापालिकेच्या पथकाने या कुत्र्याला पकडले.(Latest Pune News)

Rabid Dog Attack Pune
PIFF Monsoon Edition 2025: प्रेक्षकांच्या आग्राहास्तव सुरू झाला ‌‘पिफ मान्सून एडिशन महोत्सव‌’; आंतरराष्ट्रीय चित्रपटांची मेजवानी पुणेकरांसाठी

सोसायटी परिसरात सकाळपासूनच पिसाळलेला कुत्रा फिरत होता. दुपारपर्यंत अनेकांना जखमी केल्यानंतर नागरिकांनी महापालिका आणि स्वयंसेवी संस्थेला कळवले. महापालिकेच्या सहायक आयुक्त प्रज्ञा पोतदार-पवार यांना या घटनेची माहिती मिळताच, त्यांनी श्वान पथकाच्या तीन गाड्या आणि पंधरा ते वीस पथकातील कर्मचारी यांना घटनास्थळी जाऊन कार्यवाहीचे आदेश दिले.

Rabid Dog Attack Pune
FYJC admission 2025: अकरावी प्रवेशाचे वाजले ‘बारा’! बारा फेऱ्यांनंतरही राज्यात सव्वाआठ लाख जागा रिक्त

रात्री दहाच्या सुमारास महापालिका श्वानपथक आणि युनिव्हर्सल स्वयंसेवी संस्थेच्या पथकाने तत्परतेने कारवाई करत या पिसाळलेल्या कुत्र्याला अखेर पकडले. तसेच चावा घेतलेल्या इतर भटक्या कुत्र्यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेत जखमी झालेल्या मुलांवर ससून हॉस्पिटल आणि कमला नेहरू रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news