‘पिक्सल्स’ने सुरू होणार पुरुषोत्तमची महाअंतिम फेरी

‘पिक्सल्स’ने सुरू होणार पुरुषोत्तमची महाअंतिम फेरी
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रीय कलोपासकतर्फे आयोजित पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेची महाअंतिम फेरी बुधवारपासून (दि. 27) पुण्यात रंगणार आहे. विद्यार्थ्यांनीही जोरदार तयारी केली असून, त्यांच्यात कमालीचा उत्साह आणि जोश पाहायला मिळत आहे. पुण्यासह कोल्हापूर, रत्नागिरी, छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती विभागातील 19 संघांमध्ये 'पुरुषोत्तम'चा महाकरंडक पटकाविण्यासाठी चुरस होणार आहे. पुण्यातील टिळक आयुर्वेद महाविद्यालयाच्या 'पिक्सल्स' एकांकिकेने स्पर्धेच्या महाअंतिम फेरीला सुरुवात होणार आहे. स्पर्धेसाठी मंगळवारी (दि. 26) सायंकाळी लॉट्स काढण्यात आले.

बुधवारी (दि. 27) आणि गुरुवारी (दि. 28) सकाळी 9 ते दुपारी 1 आणि सायंकाळी 5 ते रात्री 9 या वेळेत तर शुक्रवारी (दि. 29) सकाळी 9 ते दुपारी 1 अशा पाच सत्रांत स्पर्धा होणार आहे. स्पर्धेचे पारितोषिक वितरण शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता सूर्यकांत कुलकर्णी यांच्या हस्ते होणार आहे. बुधवारी (दि. 27) महाअंतिम फेरीच्या पहिल्या दिवशी सकाळी 9 वाजता टिळक आयुर्वेद महाविद्यालय, पुणे (पिक्सल्स), देवगिरी महाविद्यालय नाट्यशास्त्र विभाग, छत्रपती संभाजीनगर (खळगं खळगं), डॉ. विठ्ठलराव खोब्रागडे कला व वाणिज्य महाविद्यालय, नागपूर (न्यायालयात जाणारा प्राणी), प्रा. राम मेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड रिसर्च (साकव) या संघांच्या एकांकिका सादर होणार आहेत. तर सायंकाळी 5 वाजता मॉडर्न महाविद्यालय गणेशखिंड, पुणे (फेलसेफ), सिपना अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, अमरावती (रात्र अंधार), शहाजी लॉ कॉलेज, कोल्हापूर (जंगल जंगल बटा चला है), सर परशुरामभाऊ महाविद्यालय, पुणे (कृष्णपक्ष) या संघांच्या एकांकिका सादर होतील.

गुरुवारी (दि. 28) सकाळी 9 वाजता फिनोलेक्स अभियांत्रिकी महाविद्यालय, रत्नागिरी (बोबड्या), प्रताप महाविद्यालय, अमळनेर (तो पाऊस आणि टाफेटा), वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्था, नागपूर (समांतर), डी. बी. जे. महाविद्यालय, चिपळूण (हॅपी फादर्स डे) या संघांच्या एकांकिका सादर होणार आहेत. सायंकाळी पाच वाजता मराठवाडा विधी महाविद्यालय, पुणे (रवायत- ए-विरासत), देशभक्त रत्नाप्पा कुंभार वाणिज्य महाविद्यालय, कोल्हापूर (असणं नसणं), शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर (चुकलं तर माफ करा), डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नाट्यशास्त्र विभाग, छत्रपती संभाजीनगर (अल्प भूधारक) या संघांच्या एकांकिकांचे सादरीकरण होईल. शुक्रवारी (दि. 29) सकाळी नऊ वाजता प्रा. संभाजीराव कदम महाविद्यालय, देऊर, सातारा (पाहिजे म्हणजे पाहिजे), महावीर महाविद्यालय, कोल्हापूर (निर्झर), स. ह. केळकर कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय, देवगड (वन पीस) या संघांच्या एकांकिका सादर होतील.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news