Purandar Drought Relief: पुरंदर तालुक्यात दुष्काळाचा ४३ हजार शेतकऱ्यांना फटका; ३४.८५ कोटींच्या मदतीची प्रतीक्षा

२३ हजार ६८४ हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसान; रब्बी हंगामासाठी १५ हजार ८६० शेतकऱ्यांना ज्वारीचे मिनी किट देण्याचे नियोजन
Drought
DroughtPudhari
Published on: 
Updated on: 

सासवड: पुरंदर तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात दुष्काळसदृश परिस्थितीमुळे तब्बल २३ हजार ६८४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका बसला आहे. यामुळे तालुक्यातील ४३ हजार ८९ शेतकरी बाधित झाले आहेत. त्यांना शासनाकडून ३४ कोटी ८५ लाख ५०० रुपयांची आर्थिक मदत मिळण्याची अपेक्षा आहे. तालुका कृषी अधिकारी श्रीधर चव्हाण यांनी ही माहिती दिली.

Drought
Cyclone Arnab News: अर्णब चक्रीवादळ आज रात्री वेग घेणार; बुधवारी विशाखापट्टणमला धडकणार, महाराष्ट्रात मोठ्या पावसाचे संकेत

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार तालुका प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे पूर्ण केले आहेत. महसूल विभाग, पंचायत समिती आणि कृषी विभागाच्या संयुक्त कार्यवाहीतून हे पंचनामे करण्यात आले. यंदाच्या खरीप हंगामात तालुक्यातील ३३ हजार २११ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. त्यापैकी २३ हजार ६८४ हेक्टर क्षेत्राला दुष्काळाचा फटका बसल्याचे पंचनाम्यांतून समोर आले आहे.

Drought
Gangadham Chowk Drainage Pit: येरवडा दुर्घटनेतूनही घेतला नाही धडा! गंगाधाम चौकात ड्रेनेजच्या खड्ड्याभोवती सुरक्षेचा अभाव

जिरायती, बागायती आणि फळपिकांचे नुकसान

तालुक्यात सर्वाधिक फटका जिरायती क्षेत्रातील भात, बाजरी, सोयाबीन, भुईमूग आणि वाटाणा या पिकांना बसला आहे. एकूण १४ हजार १८६ शेतकऱ्यांच्या ८ हजार १२६ हेक्टर क्षेत्रावरील जिरायती पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच २३ हजार ३५६ शेतकऱ्यांच्या १२ हजार ८४१ हेक्टर बागायती क्षेत्रातील ऊस आणि भाजीपाला पिके बाधित झाली आहेत.

Drought
Pune Diwali Diyas: पुण्यात दिवाळीच्या पणत्यांची बाजारपेठ सजली; कमळ, मोर, वृंदावनासह वॉल हॅगिंग दिव्यांना पसंती

याशिवाय ५ हजार ५४७ शेतकऱ्यांच्या सीताफळ, डाळिंब, आंबा, पेरू आणि अंजीर या फळपिकांचे २ हजार ७१७ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. अशा प्रकारे तालुक्यातील एकूण २३ हजार ६८४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्य शासनाच्या २०२३ मधील निकषांनुसार बाधित शेतकऱ्यांना मदत मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, प्रत्यक्ष मदत कधी मिळणार, याकडे आता शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. दुष्काळामुळे आधीच आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना ही मदत दिलासा देणारी ठरणार आहे.

Drought
Purandar Crime: पुरंदरमधील वृद्ध दाम्पत्याच्या दुहेरी हत्येतील संशयित २४ तासांत जेरबंद

चार किलो ज्वारीचे बियाणे मिळणार

राष्ट्रीय अन्नसुरक्षा आणि पोषण उपअभियानांतर्गत पौष्टिक तृणधान्य (रब्बी ज्वारी) २०२६-२७ या उपक्रमातून पुणे जिल्ह्यातील १५ हजार ८६० शेतकऱ्यांना ज्वारीचे मिनी किट देण्याचे नियोजन आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना प्रत्येकी चार किलोप्रमाणे एकूण ६३४.४० क्विंटल ज्वारीचे बियाणे वितरित करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी श्रीधर चव्हाण यांनी केले आहे.

रब्बीसाठी उपाययोजना

दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेऊन आगामी रब्बी हंगामात चारा आणि मका पिकांचे नियोजन करण्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेतला आहे. ऑनलाइन वेबिनारच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. चारा पिकांचे क्षेत्र वाढविणे, पीक व्यवस्थापनाची आधुनिक तंत्रे आणि उत्पादनवाढीसाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती शेतकऱ्यांना दिली जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news