Invasive Sucker Mouth Fish: उजनी धरणात ॲमेझॉनचा धोकादायक सकरमाउथ मासा; जैवविविधतेला मोठा धोका

भीमा नदी व जलाशयांमध्ये पसरलेल्या या परकीय माशावर नियंत्रणासाठी भारतातील पहिला विशेष प्रकल्प हाती घेण्यात आला
Sucker Mouth Fish
Sucker Mouth FishPudhari
Published on
Updated on

भरत मल्लाव

भिगवण: दक्षिण अमेरिकेतील ॲमेझॉन नदीचा मूळ रहिवासी असलेला सकरमाउथ (हेलिकॉप्टर) मासा फिश टँकच्या माध्यमातून देशातील अनेक जलाशयांमध्ये पोहोचला आहे. तो मच्छीमार आणि स्थानिक प्रजातींसाठी महासंकट बनला आहे.

Sucker Mouth Fish
Pune Bal Pustak Jatra: ४० हजार मुलांची गर्दी; वाचन संस्कृतीला मोठा प्रतिसाद

या सकर माशाने भीमा नदीला जोडलेल्या जलस्रोतांमध्ये त्यातही विशेषतः उजनी धरणात बाळसे धरले आहे. या सकर माशांचा संभाव्य धोका ओळखून बीएचएनएसने याच्या समूळ उच्चाटन व निर्मूलनासाठी भारतात पहिला प्रकल्प हाती घेतला आहे.

Sucker Mouth Fish
Baramati Bypoll Victory: बारामतीत ‘सुनेत्रापर्व’ची दमदार सुरुवात; विक्रमी विजयातून अजितदादांना श्रद्धांजली

या सकर जातीच्या माशांमुळे नदी व जलाशयातील देशी व प्रमुख कार्प जातींच्या माशांना तसेच जैवविविधतेला मोठा धोका निर्माण झाला आहे. या माशाची प्रजननक्षमता मोठी आहे; शिवाय या माशाला इतर मासे खात नसल्याने सकरची संख्या लक्षणीय वाढली आहे. याशिवाय, हा मासा मच्छीमारांच्या जाळ्यात अडकला, तर जाळ्यांचे मोठे नुकसान करतो. जाळे फाडून काढल्याशिवाय पर्याय राहत नाही.

Sucker Mouth Fish
Pune Fake Police Theft: ‘पोलिस’ बनून चोरट्यांचा डाव; कोथरूड-पाषाणमध्ये ज्येष्ठांची ५ लाखांची लूट

बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या पाहणीनुसार या सकर जातीच्या माशाचा सर्वांत मोठा आणखी धोका म्हणजे केवळ हा मासा स्थानिक माशांच्या प्रजाती आणि इतर प्राण्यांनाच हानी पोहचवतो असे नाही, तर नदी आणि तलावांच्या काठांमध्ये पोखरून ते पाण्याच्या स्रोतांसाठीही धोकादायक ठरतात. याचा परिणाम धरणे, बंधारे आणि तलावांच्या मजबुतीवर देखील होत असल्याचे अभ्यासाअंती निदर्शनास आले आहे.

Sucker Mouth Fish
Maharashtra IPS SP Post Competition: एसपी पदासाठी स्पर्धा थांबवा; डीजीपी सदानंद दाते यांची आयपीएस अधिकाऱ्यांना सुनावणी

हे मासे खाण्यायोग्य नसल्यामुळे त्यांची विक्री केली जात नाही. केवळ भुगा (टाकाऊ माल) म्हणून याची खरेदी केली जाते. पुढे तळोजा तसेच रत्नागिरी येथील फिश ऑईल तसेच खत बनविण्यासाठी उपयोग केला जातो, अशी माहिती बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. उन्मेष काटवटे यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news