Purandar Airport : पुरंदर विमानतळाच्या प्रभाव क्षेत्रात कोठेही उंच इमारती होऊ देणार नाही: महसूलमंत्री चंद्रशेखर बाबनकुळे

भूसंपादनाची प्रक्रिया 90 टक्के पूर्ण; निवडणूक व शेतकरी पॅकेजसह महायुती सरकारचा भर
Purandar Airport
पुरंदर विमानतळाच्या प्रभाव क्षेत्रात कोठेही उंच इमारती होऊ देणार नाही(File Photo)
Published on
Updated on

पुणे : विमानतळाच्या प्रभाव क्षेत्रात कोठेही घरे, व उंच इमारती होणार नाहीत. जागेची खरेदी-विक्री होणार नाही, याची काळजी सरकार म्हणून आम्ही घेऊ, अशी भूमिका महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे स्पष्ट केली. (Latest Pune News)

पुरंदर विमानतळाच्या 90 टक्के जागेचे भूसंपादन झाले आहे. उर्वरित भूसंपादन लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. विमानतळाच्या शेजारी अनेक जागांची विक्री होत असून भविष्यात या ठिकाणी उंच इमारती उभारल्या जातील अशी शक्यता पत्रकारांनी व्यक्त केल्यानंतर बावनकुळे यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली.

Purandar Airport
PM Dhan Dhanya Krishi Yojana: शेतकऱ्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्यास प्राधान्य; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये आज येथे झालेल्या पश्चिम महाराष्ट्रातील भाजप पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना बावनकुळे म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 51 टक्के मते घेऊन महायुती विजयी होईल. त्यानंतर केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विकासाची कामे केली जातील, हा विश्वास राज्यातील जनतेला आहे. महायुती 51 टक्क्यावर आहे, हे विरोधकांचे सर्वे सांगत आहेत. त्यामुळे हारलेल्या मानसिकतेतून ते स्टंटबाजी करत निवडणूक आयोगाची भेट घेत आहेत.

Purandar Airport
Rabid Dog Attack Pune: पिसाळलेल्या कुत्र्याचा पाच मुलांना चावा; सिंहगड रस्ता परिसरातील पीएमएवाय सोसायटीत दहशत

बावनकुळे म्हणाले, बैठकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती कायम ठेवणे, समन्वय साधने, शेतकरी पॅकेजचा लाभ शेतकऱ्यांना मिळेल, यासाठी कार्यकर्त्यांनी परीश्रम घेणे यांसह संघटनात्मक बाबींवर चर्चा झाली.

Purandar Airport
PIFF Monsoon Edition 2025: प्रेक्षकांच्या आग्राहास्तव सुरू झाला ‌‘पिफ मान्सून एडिशन महोत्सव‌’; आंतरराष्ट्रीय चित्रपटांची मेजवानी पुणेकरांसाठी

उद्धव ठाकरे सर्वात हतबल मुख्यमंत्री

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना बावनकुळे म्हणाले, प्रकल्प थांबले तरी चालतील पण दिवाळीत शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये. यासाठी महायुती सरकारने अतिवृष्टीग्रस्तांसाठी साडेएकतीस हजार कोटींचे मदतीचे पॅकेज जाहीर केले. हा पीक विमा नाही. त्यामुळे विरोधक जे आरोप करत आहेत ते चुकीचे आहेत. उद्धव ठाकरेंना अडीच वर्षात मुख्यमंत्रीपद समजलेच नाही. ते विधानसभेत केवळ दोन वेळा, मंत्रालयात दोन वेळा आले. उद्धव ठाकरे हे आत्तापर्यंतचे सर्वात हतबल मुख्यमंत्री ठरले आहेत.

Purandar Airport
Eco-Friendly Diwali Sky Lanterns: आकाशकंदिलांच्या झगमगाटाने फुलली पिंपरीची बाजारपेठ

उद्धव ठाकरे यांचे खासदार निवडून आल्यानंतर पाकिस्तानचे ध्वज फडकले, त्यामुळे इम्तियाज जलिल त्यांना साथ देणारच, अशी टीका देखील बावनकुळे यांनी या वेळी केली.

जोपर्यंत न्यायालय शिक्षा देत नाही, तोवर गुन्हेगार कसे समजायचे ?

गुंड नीलेश घायवळला शस्त्र परवाना कुणी दिला या प्रश्नावर उत्तर देतांना बावनकुळे म्हणाले, गुंड नीलेश घायवळला शस्त्र परवाना कुणाच्या सरकारने दिला? पासपोर्टची शिफारस करताना गुन्हे नाहीत, असे कोणाच्या सरकारच्या काळात सांगण्यात आले? हे सर्व पोलिस तपासामध्ये समोर येणार असून या बाबत पोलिस उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांना जेरबंद करतील. राम शिंदे व घायवळ यांच्या संबंधाबद्दल शिंदे यांनाच विचारावे लागेल, असे म्हणत बावनकुळे यांनी जोपर्यंत न्यायालय शिक्षा देत नाही, तोवर गुन्हेगार कसे समजायचे? असे पत्रकारांना उत्तर दिले. उद्धव ठाकरे यांचे खासदार निवडून आल्यानंतर पाकिस्तानचे ध्वज फडकले, त्यामुळे इम्तियाज जलिल त्यांना साथ देणारच, अशी टीका देखील बावनकुळे यांनी या वेळी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news