Pune HCMTR Project: पुण्याच्या वाहतुकीस मोठा दिलासा! एचसीएमटीआर, रिंगरोड आणि ‘पाताळलोक’ प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांचा वेग

२०२८ पर्यंत एचसीएमटीआर पूर्ण करण्याचे निर्देश; रिंगरोडसाठी रोख मोबदला, बोगदा प्रकल्पाचे सर्वंकष सर्वेक्षण करण्याचे आदेश
HCMTR Project
HCMTR ProjectPudhari
Published on
Updated on

पुणे: पुणे शहर व परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी उच्चक्षमता उन्नत सामूहिक वाहतूक मार्ग (एचसीएमटीआर), अंतर्गत रिंगरोड आणि बोगद्यांचे जाळे (पाताळलोक) या प्रकल्पांसाठी शासकीय जमिनींचा आगाऊ ताबा, भूसंपादन आणि प्रकल्पनिहाय प्रशासकीय प्रक्रिया समन्वयाने पूर्ण करून संबंधित पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिले.

HCMTR Project
Khed Market Committee Chairman Election: खेड बाजार समितीच्या सभापतीपदी अशोक राक्षे; रणजीत गाडे उपसभापतीपदी बिनविरोध

पुण्यातील प्रमुख शहरी वाहतूक प्रकल्पांच्या नियोजन, वित्तीय व्यवस्थापन, अंमलबजावणी, देखरेखीसाठी गठित मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीची बैठक मुंबईतील सह्याद्री अतिथिगृह येथे झाली. या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम, पिंपरी-चिंचवड आयुक्त विजय सूर्यवंशी, पुणे महानगर विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त अभिजित चौधरी, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, अति. पोलिस आयुक्त मनोज पाटील यांच्यासह राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

HCMTR Project
Shirur Crime: चारित्र्याच्या संशयातून पत्नीची निर्घृण हत्या; शिरूरमध्ये पतीने लाकडी दांडक्याने संपविले जीवन

बैठकीत एचसीएमटीआर, रिंगरोड आणि पाताळलोक या तीन प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले. या वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी या तीनही प्रकल्पांसाठी लागणारी शासकीय जमीन पुणे महापालिका व पुणे महानगर विकास प्राधिकरण यांना देण्यासाठी एकत्रित शासन निर्णय काढण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात यावे. तसेच, रिंगरोड प्रकल्पासाठी लागणारी खासगी जमीन संपादनासाठी रोख मोबदला देण्यात यावा. तसेच, एचसीएमटीआर या प्रकल्पाचे काम लवकर सुरू करून २०२८ पर्यंत पूर्ण करण्यात यावे. यासाठीचे आर्थिक मॉडेल तयार करून प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी या वेळी दिले.

एचसीएमटीआरसाठी शासकीय जागा विनाशुल्क

एचसीएमटीआर प्रकल्पातील ३० जागा शासकीय आहेत. या जागा महापालिकेला विनाशुल्क देण्यात याव्यात, अशी मागणी आयुक्त राम यांनी केली, त्यावर मुख्यमंत्र्यांनी याबाबत प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश दिले.

HCMTR Project
Maharashtra Rain Update: राज्यात पावसाची जोरदार बॅटिंग; १४४ तालुक्यांत जुलैची सरासरी १०० टक्के पूर्ण

रिंगरोडसाठी रोख मोबदला द्यावा

पीएमआरडीएद्वारे राबविण्यात येणारा अंतर्गत रिंगरोड हा प्रकल्प ८३.१२ किमीचा असून, यामध्ये ४४ गावांचा समावेश आहे. या अंतर्गत रिंगरोडचे काम पाच टप्प्यात राबविण्यात येणार आहे. यासाठी प्रकल्पाची प्रक्रिया येत्या सहा ते सात महिन्यांत पूर्ण करावी, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी या वेळी सांगितले. रोख मोबदला देऊन रिंगरोडच्या भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्याची सूचनाही त्यांनी या वेळी केली.

पाताळलोक प्रकल्पाचे सर्वंकष सर्वेक्षण करा

पाताळलोक प्रकल्पांतर्गत शहरात तीन ठिकाणी बोगदे तयार करण्यात येणार आहेत. यामध्ये भोसरी ते उंड्री-नवीन विमानतळ (३६ किमी यामध्ये १० किमी एलिव्हेटेड), रामनदी-भूगाव ते राजाराम पूल (८ किमी) आणि तळजाई टेकडी ते पद्मावती-हिंगणे (१.६५ किमी) या बोगद्यांचे प्रस्तावित आहे. या बोगद्यांच्या जाळ्यांचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञ संस्थेची अथवा तज्ज्ञांची मदत घेऊन सर्वंकष सर्वेक्षण करावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

टीपीएस योजना रद्दचा प्रस्ताव पाठवा

पीएमआरडीएच्या प्रस्तावित नगररचना (टीपीएस) योजनेसंदर्भात या वेळी चर्चा करण्यात आली. पीएमआरडीए व पुणे महापालिकेच्या १५ नगररचना योजना प्रस्तावित असून, या योजना रद्द करण्यासंदर्भात पीएमआरडीएने आपल्या स्तरावर प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठविण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिले.

HCMTR Project
Khadakwasla Dam Water Storage: खडकवासला धरणसाखळी ९० टक्क्यांवर; पानशेत १०० टक्के भरण्याच्या मार्गावर, पुण्याची पाण्याची चिंता मिटली

असा आहे एचसीएमटीआर मार्ग

  • एकूण अंदाजे ३६ किमी लांबीचा सहापदरी उन्नत मार्ग

  • शहरातील मध्यवर्ती नागरी भागातून जाणार

  • प्रकल्पाचा अपेक्षित खर्च : बांधकाम खर्च सुमारे ९ हजार कोटी, भूसंपादनासाठी खर्च सुमारे ३ हजार कोटी

सार्वजनिक वाहतुकीशी एकात्मीकरण करणार

एचसीएमटीआरमधील पॅकेज : बोपोडी ते सिंहगड रस्ता (१०.५ किमी), सिंहगड रोड ते सोलापूर रोड (१३.२ किमी), सोलापूर रोड ते एअरपोर्ट चौक (१०.२१ किमी), एअरपोर्ट चौक ते बोपोडी (९.१७ किमी)

पीएमआरडीएच्या अंतर्गत रिंगरोडची वैशिष्ट्ये:

  • प्रकल्पाचा एकूण खर्च २५,१५९.८८ कोटी

  • प्रकल्पाचे टप्पे : टप्पा १ - सोळू इंटरचेंज ते वडगाव शिंदे (मनपा हद्द) (४.७० किमी लांबी), लोहगाव (मनपा हद्दीपासून) ते वाघोली (७.५६ किमी).

  • टप्पा २ – वाघोली ते कदमवाकवस्ती (९.३६ किमी लांबी)

  • टप्पा ३ – कदमवाकवस्ती ते जांभुळवाडी (२१.४८ किमी)

  • टप्पा ४ – जांभुळवाडी ते भूगाव (१४.२१ किमी)

  • टप्पा ५ – भूगाव ते परंदवाडी (२५.८० किमी)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news