

निमोणे: शिरूर ग््राामीण-न्हावरे जिल्हा परिषद गटातील मोजक्या एक-दोन ग््राामपंचायती सोडल्या, तर बहुतांश ग््राामपंचायतींना फक्त घरपट्टीवर आपला डोलारा सांभाळावा लागत असल्याने गावविकासाचे अनेक प्रश्न वर्षानुवर्षे तसेच पडून असल्याचे वास्तव आहे.
केंद्र तसेच राज्याचा येणारा निधी, यावर उभा राहिलेला विकास, हा निकषावर असतो. मात्र, ग््राामपंचायतीचा स्वतःचा असा थेट उल्लेखनीय असा काही सहभाग त्यामध्ये नसतो. ज्या दिवसापासून ग््राामपंचायती अस्तित्वात आल्या तेव्हापासून आजपर्यंत रस्ते, समाजमंदिर, शाळा, पिण्याचे पाणी, याच प्रश्नांभोवती कोणतीही निवडणूक फिरते. सरकारी निधीतून यातील बहुतांश प्रश्न निकाली निघाले आहेत. मात्र, बदलत्या जीवनमानामुळे ग््राामीण भागात देखील वेगवेगळे प्रश्न निर्माण झाले आहेत.
निमोणे, शिंदोडी, चिंचणी, गुणाट, आंबळे आदी गावांतील ग््राामपंचायतींना स्वतःचे शाश्वत उत्पन्न नाही, कररूपाने येणारा पैसा आणि त्यामधून कर्मचारी पगार वजा करता गावविकासाला चालना देण्यासाठी खूप कमी प्रमाणात निधी शिल्लक राहतो. आगामी निवडणुकीमध्ये प्रत्येक गावच्या शाश्वत विकासाला काय मिळणार? या पद्धतीचे प्रश्न उभे राहू लागले आहेत.
छोट्या गावांमध्ये नागरीकरण वाढतेय, कचऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यादृष्टीने स्थानिक ग््राामपंचायतींवर काही धाडसी निर्णय घेण्याची वेळ आली, तर आर्थिक बाजू शिकस्त असल्याने निर्णय घेता येत नाही. त्यामुळे रस्ते, पाणी, वीज, शाळा यापुढे गावच्या नव्याने निर्माण झालेल्या समस्या सोडविण्यासाठी ग््राामपंचायतीला स्वतःचे उत्पन्न निर्माण करता येईल. यासाठी काही कार्यक्रम देणे हे खूप गरजेचे आहे; मात्र निवडणुकीच्या या धामधुमीत या महत्त्वाच्या प्रश्नाकडे सध्यातरी डोळेझाक केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
विविध प्रश्न ऐरणीवर
आजही प्रगत तंत्रज्ञानाला साद घालून त्या पद्धतीच्या सुखसुविधा ग््राामीण विद्यार्थ्यांना उपलब्ध नाहीत, स्पर्धा परीक्षेमध्ये नशीब आजमावणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या गावात चांगल्या पद्धतीचे ग््रांथालय नाही, भविष्यात होऊ घातलेल्या जलजीवन योजनेमध्ये ती कार्यरत ठेवण्यासाठी त्या पटीत निधी ग््राामस्थ उभा करू शकतील का? हा देखील प्रश्न ऐरणीवर आला आहे.