Marriage Fraud Pune: लग्नाचे आमिष, प्रेमाचा सापळा अन् आर्थिक फसवणूक; तरुणीकडून 3.45 लाखांचा गंडा

शरीरसंबंध, कर्ज काढायला भाग पाडून पैसे उकळले; मोबाईल घेऊन आरोपी फरार, विश्रांतवाडी पोलिसांत गुन्हा दाखल
Sexual Assault Case
Sexual Assault Case File Photo
Published on
Updated on

पुणे : मैत्री करून प्रेमाच्या जाळ्यात ओढल्यानंतर लग्नाच्या आमिषाने तरुणीसोबत वेळोवेळी शरीरसंबंध ठेवले. त्यानंतर तिचा विर्श्वास संपादन करून तिला लोन काढण्यास भाग पाडून 2 लाख 70 हजार रुपये घेऊन फसवणूक केली. एवढेच नाही तर तरुणीचा 75 हजार रुपये किमतीचा मोबाईल दोन तासांसाठी पाहिजे, असे म्हणत घेवून तो पळून गेला.

Sexual Assault Case
Pune Mumbai missing link: 32 तासांची कोंडी अन् प्रश्नचिन्ह; पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ कधी पूर्ण?

याप्रकरणी एक 26 वर्षीय तरुणीने विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी मनप्रीत सिंग केंथ उर्फ करन (वय 35, रा. मालाड वेस्ट, मुंबई उपनगर) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जून 2025 ते 5 फेबुवारी 2026 दरम्यान हा प्रकार घडला आहे.

Sexual Assault Case
Swapnali Pandit corporator: संघ-संस्कारातून सभागृहापर्यंत; स्वप्नाली पंडितांचा नगरसेविकेपर्यंतचा प्रवास

पोलिसांच्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणीची आणि आरोपीचा परिचय झाल्यानंतर त्याने मैत्रीच्या बहाण्याने तरुणीला आपल्या जाळ्यात खेचले. त्यानंतर लग्नाचे प्रलोभन दाखवून तरुणीसोबत शरीरसंबंध ठेवले. तसेच तरुणीचा विर्श्वास संपादन केल्यानंतर त्याने तरुणीला तिच्या नावावर फायनान्सचे लोन घेण्यास भाग पाडले.

Sexual Assault Case
Hadapsar Ward election result: हडपसर-सातववाडीत तिसऱ्या पॅनेलचा फटका; राष्ट्रवादीचे वर्चस्व ढासळले, उबाठाची एंट्री

मी त्याचे हप्ते भरतो असे सांगून आरोपीने तरुणीकडून 2 लाख 70 हजार रुपये घेतले. तरुणीचा 75 हजार रुपये किमतीचा मोबाईल देखील घेऊन आरोपी फरार झाला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने याबाबत विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news