Pune Woman Death Blackmail Case: डस्टबिनमधील फाडलेली चिठ्ठी जोडताच उघड झाला विवाहितेच्या आत्महत्येचा धक्कादायक प्रकार

जुन्या छायाचित्रांवरून ब्लॅकमेलिंग, पैशांची मागणी आणि मानसिक छळ; चंदननगरमध्ये 27 वर्षीय महिलेची आत्महत्या, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
Women Suicide
Women SuicidePudhari
Published on
Updated on

पुणे: डस्टबिनमध्ये फाडून टाकलेल्या कागदाचे कपटे जोडताच विवाहितेच्या आत्महत्येमागील प्रकार उघडकीस आला आहे. तिला ब्लॅकमेल केले जात असल्यानेच तिने आत्महत्येचे पाऊल उचलल्याचे समोर आले.

Women Suicide
Pune Traffic Fine License Suspension Warning: वाहतूक दंड न भरल्यास परवाना निलंबित होणार! पुणे पोलिसांचा इशारा

जुनी छायाचित्रे व्हायरल होण्याची भीती व मानसिक छळामुळे त्रस्त झालेल्या 27 वर्षीय महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना चंदननगर परिसरात घडली होती. या प्रकरणी करण शिंदेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेखा नाव बदललेले (वय 27) असे मृत महिलेचे नाव आहे. याबाबत तिच्या भावाने चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, रेखाचे लग्न 2016 मध्ये झाले होते. तिला एक मुलगा आहे. ती पुण्यात एका कंपनीत रिसेप्शनिस्ट म्हणून काम करीत होती.

Women Suicide
Pune Hospital Medico-Legal Cases: पुण्यातील रुग्णालयांमध्ये एमएलसी प्रकरणे वाढली; आपत्कालीन सेवा आणि मनुष्यबळावर दबाव

करण शिंदे हा रेखाच्या परिचयात असून, सप्टेंबर ते डिसेंबर 2024 दरम्यान तो त्यांच्या घरी वास्तव्यास होता. याच काळात त्याने रेखाला प्रेमाच्या जाळ्यात ओढल्याचा आरोप आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पती-पत्नीमध्ये वाद झाले आणि करणला घराबाहेर काढण्यात आले. दरम्यान, काही काळानंतर पती-पत्नी पुन्हा एकत्र राहू लागले. मात्र, रेखा आणि करण संपर्कात असल्याचे पुन्हा समोर आल्याने दोघांमध्ये वाद वाढले. सप्टेंबर 2025 मध्ये रेखा मुलासह माहेरी राहू लागली. पोलिस तपासात समोर आले की, रेखाला आपल्या चुकीची जाणीव झाली होती. तिने करणशी संबंध तोडून पुन्हा संसार सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.

Women Suicide
Pune POCSO Cases: पुण्यातील बाललैंगिक अत्याचार खटले: न्यायालयीन प्रक्रियेत साक्ष फितुरी आणि सामाजिक दबाव मोठा अडथळा!

मात्र, करण तिला तसे करू देत नव्हता. जुने फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तो पैशांची मागणी करीत होता. सततच्या धमक्यांमुळे आणि मानसिक तणावामुळे रेखा नैराश्यात गेली होती. 9 फेबुवारीला रात्री 8 च्या सुमारास ती घरात एकटी असताना गळफास घेतला. दरवाजा न उघडल्याने नातेवाइकांनी दरवाजा तोडला असता ती मृतावस्थेत आढळली. या आत्महत्येचा तपास चंदननगर पोलिस करीत असतानाच तपासादरम्यान पोलिसांच्या हाती महत्त्वपूर्ण पुरावा लागला. सुसाइड नोट व इतर पुराव्यांच्या आधारे चंदननगर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

Women Suicide
Pune 20 Year Prison Sentence: भोर तालुक्यात मुलीवर लैंगिक अत्याचार – आरोपीला २० वर्षे शिक्षा!

ऑफिसमधील डस्टबिनमध्ये सापडली फाडलेली चिठ्ठी

तपासादरम्यान रेखा ज्या ऑफिसमध्ये स्वागतिका म्हणून काम करीत होती. त्या तिच्या ऑफिसमधील डस्टबिनमध्ये फाडलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली. पोलिसांनी पारदर्शक टेपच्या साहाय्याने ती जोडून वाचली असता, ब्लॅकमेलिंगचा संपूर्ण प्रकार उघड झाला. सुसाईड नोटमध्ये तिने करण शिंदे सातत्याने धमक्या देत असल्याचे, पैशांची मागणी करीत असल्याचे नमूद केले होते. तसेच, मोबाईलमध्ये कॉल रेकॉर्डिंग आणि व्यवहारांचे पुरावे असल्याचेही लिहिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news