Pune Winter Temperature: पुण्यात थंडीची चाहूल; एनडीए परिसरात राज्यातील नीचांकी ११.९ अंश तापमानाची नोंद

शिवाजीनगरचा पारा १४.३ अंशांवर; अल-निनो आणि बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळामुळे यंदा थंडीचे आगमन उशिरा
Winter
WinterPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: यंदाच्या हंगामात राज्यात सर्वांत नीचांकी तापमान शहरातील एनडीए भागाचे किमान तापमान ११.९ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. यापूर्वी २७ नोव्हेंबर १९६४ रोजी शहराचे किमान तापमान ४.६ अंश इतके नोंदले गेले होते.

Winter
Ghotawade Bribery Case: सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी २० हजारांची लाच मागितली; महिला मंडल अधिकाऱ्यावर गुन्हा

अल-निनोच्या प्रभावामुळे यंदा शहरात थंडीचे आगमन उशिरा झाले. दिवाळीत गारठणारे शहर यंदा दीपावली संपताच किंचित गारठू लागले आहे. शुक्रवारी राज्यात सर्वांत कमी तापमान एनडीए भागाचे नोंदले गेले. तर, शिवाजीनगरचा पारा १४.३ अंशांवर होता.

Winter
Hadapsar Traffic Congestion: हडपसरमध्ये वाहतूक कोंडीचा विळखा; एक किलोमीटरसाठी अर्धा ते पाऊण तास, नागरिक त्रस्त

नोव्हेंबरमध्ये शहरात यापूर्वी किमान तापमानाचा पारा ४.६ ते ९ अंशांवर अनेकवेळा खाली आला आहे. मात्र, यंदा पारा १० अंशांपेक्षा खाली जाण्याची शक्यता फार कमी आहे. कारण, बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार होत असल्याने उष्ण-दमट वारे राज्यात वारंवार येत आहे.

Winter
Alandi Crime: आळंदीत नगरपालिकेसमोरील चौकात तरुणावर खंजीराने हल्ला; पूर्वीच्या भांडणाचा राग

शुक्रवारचे शहरासह जिल्ह्याचे किमान तापमान

एनडीए ११.९, शिवाजीनगर १४.३, पाषाण १४.५, पुरंदर १४.९, अंबेगाव १५.८, चिंचवड १८.३, मगरपट्टा १८.२, हडपसर १६.३, माळीण १२.६, तळेगाव १४, बारामती १४.४

Winter
Ot​​ur Kalyan Highway Accident: ओतूर-कल्याण महामार्गावर भीषण अपघात; २४ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

नोव्हेंबरमधील नीचांकीचे विक्रम

  • २७ नोव्हेंबर १९६४— ४.६

  • १९ नोव्हेंबर २०१२— ७.९

  • २७ नोव्हेंबर २०१६— ९.३

  • १७ नोव्हेंबर २०१३— ९.९

  • ३०नोव्हेंबर २०१४— ११.२

  • १८ नोव्हेंबर २०१५ — १२.९

  • ३ नोव्हेंबर २०१७ — ११.४

  • १२ नोव्हेंबर २०२१ — ९.८

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.