Ghotawade Bribery Case: सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी २० हजारांची लाच मागितली; महिला मंडल अधिकाऱ्यावर गुन्हा

घोटावडे येथील मंडल अधिकारी रोहिणी गुप्ते यांच्यावर पौड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल; एसीबीच्या पडताळणीत स्वतःसाठी पाच हजारांची लाच मागितल्याचे निष्पन्न
Bribery Case
Bribery Casefile photo
Published on: 
Updated on: 

पुणे: जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर आणि फेरफारवर नावाची नोंद करण्यासाठी तक्रारदाराकडे २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी घोटावडे येथील महिला मंडल अधिकाऱ्याविरुद्ध पौड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ही कारवाई केली. रोहिणी शशांक गुप्ते (वय ५७, मंडल अधिकारी, घोटावडे, रा. सदाशिव पेठ) असे त्यांचे नाव आहे.

Bribery Case
Hadapsar Traffic Congestion: हडपसरमध्ये वाहतूक कोंडीचा विळखा; एक किलोमीटरसाठी अर्धा ते पाऊण तास, नागरिक त्रस्त

तक्रारीच्या पडताळणीदरम्यान त्यांनी स्वतःसाठी पाच हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. याबाबत ४० वर्षीय नागरिकाने २४ जुलै २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारदार यांनी मोजे केमसेवाडी येथे १२ आर क्षेत्र खरेदी केले होते.

Bribery Case
Alandi Crime: आळंदीत नगरपालिकेसमोरील चौकात तरुणावर खंजीराने हल्ला; पूर्वीच्या भांडणाचा राग

या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर आणि फेरफार नोंदीवर नोंद केल्याच्या मोबदल्यात मंडल अधिकारी गुप्ते यांनी तक्रारदाराला मोबाइलवरून संपर्क केला होता. या कामासाठी स्वतःसाठी आणि तलाठ्यासाठी प्रत्येकी दोन नोंदींचे पाच-पाच हजार रुपये, असे एकूण २० हजार रुपये देण्याची मागणी त्यांनी केली होती.

Bribery Case
Ot​​ur Kalyan Highway Accident: ओतूर-कल्याण महामार्गावर भीषण अपघात; २४ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

या तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २८ जुलै रोजी पडताळणी केली. त्या वेळी पंचांसमक्ष गुप्ते यांनी स्वतःसाठी पाच हजार रुपयांची लाच मागितल्याचे आणि लाचेची रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर १२ नोव्हेंबर रोजी पौड पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. गुप्ते यांना तपासासाठी ताब्यात घेण्यात आले असून, सूर्यास्त झाल्याने न्यायालयाच्या परवानगीने अटकेची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

Bribery Case
Pudhari Sur Diwali: ‘पुढारी सूर दीपावली’त मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे यांच्या सुरांनी रंगली भाऊबीजेची पहाट

पोलिस निरीक्षक प्रवीण निंबाळकर यांनी सापळा अधिकारी म्हणून, तर पोलिस निरीक्षक अशोक गवारी यांनी पर्यवेक्षण अधिकारी म्हणून काम पाहिले. पोलिस उपअधीक्षक सतीश वाळके यांच्या पथकाने ही कारवाई केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आणि अपर पोलिस अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.