Pune Wholesale Market Rates: साखर, गूळ व खाद्यतेल स्थिर; हिरव्या वाटाण्याच्या दरात घसरण

तूरडाळीसह डाळी स्थिर; नव्या गावरान ज्वारीची तुरळक आवक, गव्हाची लवकरच अपेक्षा
Oil And Pulses
Oil And PulsesPudhari
Published on
Updated on

सुभाष किवडे

पुणे: आवक-जावक कमी असल्यामुळे येथील घाऊक बाजारात साखर, गूळ तसेच सर्व खाद्यतेलांचे दर टिकून होते. आवक वाढल्यामुळे हिरव्या वाटाण्याच्या दरात आणखी घसरण झाली. मात्र, तूरडाळीसह सर्वच डाळींचे दर टिकून होते. नव्या गावरान ज्वारीची तुरळक प्रमाणात आवक सुरू झाली असली तरी अद्यापही दरवाढ कायम आहे. नव्या गव्हाची देखील लवकरच आवक अपेक्षित आहे.

Oil And Pulses
Pune Vegetable Market Prices: भाजीपाल्याची आवक वाढली; गवार, दुधी, काकडीसह दरात 10% घसरण

ट्रम्प सरकारने आकारलेल्या टॅरिफला तेथील सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यामुळे आणखी काय बदल होणार, याबद्दल अद्याप अनिश्चितता आहे. नव्याने लादलेले शुल्क रद्द झाल्यास निश्चितच दिलासा मिळणार आहे. गेल्या आठवडयात बाजारात ग्राहकांची कमतरता असल्यामुळे साखर, गूळ, खाद्यतेलांसह सर्वच जिनसांना उठाव कमी होता. यामुळे दरात फारसा बदल आढळला नाही. आवक जावक साधारण असल्यामुळे तूरडाळीसह अन्य सर्व डाळींचे दर टिकून होते. मटकी, काबुली चणा तसेच चवळीच्या दरही स्थिर असल्याचे सांगण्यात आले.

नव्या गावरान ज्वारीची जामखेड, नगर येथून तुरळक प्रमाणात आवक होत आहे. येत्या पंधरा दिवसात आवक सुरळीतपणे सुरू होईल, असा अंदाज आहे. सध्या मागणी भरपूर असून आवक कमी असल्यामुळे गावरान तसेच वसंत ज्वारीचे दर तेजीतच आहेत. नवीन आवक वाढल्यावर काय परिणाम होईल, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल. नव्या गव्हाची आवक अद्याप सुरू झालेली नाही. येत्या पंधरा दिवसाांत सर्व राज्यांतील नवा गहू उपलब्ध होईल. गेल्या आठवड्यात बाजरी, गहू तसेच आटा, रवा आणि मैद्याचे दर स्थिर होते.

Oil And Pulses
Pune Fish Market Prices: मासळी तेजीतच; चिकन, मटण आणि अंडी स्थिर

साखर, गुळाचे स्थिर

साखरेस मागणी चांगली आहे. उन्हाच्या झळा जाणवू लागल्याने शीतपेय आणि आईस्क्रिम उत्पादकांकडून साखरेस मागणी वाढत आहे. यामुळे गेल्या आठवड्यातही साखरेचे दर टिकून होते. शनिवारी येथील घाऊक बाजारात एस 30 साखरेचा प्रती क्विंटलचा दर 4 हजार ते 4 हजार 50 रुपये होता. होळीचा सण जवळ येत असला तरी अद्यापही गुळास अपेक्षित प्रमाणात मागणी नाही. यामुळे गेल्या आठवड्यात सर्व प्रकारच्या गुळाचे दर स्थिर होते. आवक जावक साधारण असल्यामुळे शेंगदाणा तेलासह सर्वच खाद्यतेले, आणि वनस्पती तुपाचे दर टिकून असल्याचे सांगण्यात आले.

Oil And Pulses
Mula Mutha River Trash Barrier: मुठा नदी प्रदूषणमुक्तीसाठी महापालिकेचा ‘ट्रॅश बॅरिअर’ निर्णय

येथील घाऊक बाजारातील शनिवारचे दर पुढीलप्रमाणे होते:-

  • साखर (प्रतिक्विंटल):- 4000-4050 रु.

  • खाद्यतेले (15किलो/लिटर):- शेंगदाणा तेल 2700-2800, रिफाईंड तेल 2230-3100, सरकी तेल 2050-2300, सोयाबीन तेल 1970-2230, पामतेल 1900-2100, सूर्यफूल रिफाईंड तेल 2000-2250, खोबरेल तेल 4800 वनस्पती 1800-2270 रु.

  • तांदूळ:- गुजरात उकडा 3500-4000, मसुरी 3500-4000, सोना मसुरी 4500-5000, एच.एम.टी. कोलम 5500-6500, लचकारी कोलम 6500-7000, चिन्नोर 4500-5000, 1121-11000-11500, आंबेमोहोर (सुवासिक) 14000-16000, बासमती अखंड 12000-13000, बासमती दुबार 9500-1000, बासमती तिबार 10000-10500, बासमती मोगरा 5500-6500, बासमती कणी 4000-4500, 1509-8500-9500, इंद्रायणी 5500-6000 रु.

  • गहू:- लोकवन नं. 1 4050-4250, लोकवन नं. 2 3650-4050, नं.3 3350-3650, सिहोर नं. 1 5700-6000, सिहोरी 3850-4450, मिलबर 3250-3300 रु. ज्वारी :- गावरान नं. 1 5700-6200, गावरान नं.2 5200-5500, नं.3 4700-5100, दूरी नं.1 3800-4000, दूरी नं. 2 3500-3700 रु

  • बाजरी:- महिको नं.1 4000-4200, महिको नं.2 3600-3800, गावरान 3300-3500, हायब्रीड 3200-3300 रु.

  • गूळ:- गूळ एक्ष्ट्रा 4450-4600, गूळ नं. 1 4200-4400, गूळ नं.2 3950-4100 गूळ नं.3 3800-3900, नं. 4 - 3650-3750, बॉक्स 3900-5000 रु.

  • डाळी:- तूरडाळ 10000-13000, हरभराडाळ 6900-7000, मूगडाळ 9000-10000, मसूरडाळ 7200- 7300, मटकीडाळ 8300-8400, उडीदडाळ 10000-12200 रु.

Oil And Pulses
Pune Smart Meter Savings Controversy: स्मार्ट मीटरमुळे बचत की फसवणूक? महावितरणच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह
  • कडधान्ये:- हरभरा 6000-6300, हुलगा 5000-5200 चवळी 7000-10000, मसूर 6600-6700, मूग 9000-9500, मटकी गावरान 12000, मटकी पॉलिश 6800-7000, मटकी गुजरात 6800-7000, मटकी राजस्थान 6800-7000, मटकी सेलम 16000-16500, वाटाणा हिरवा 7000-7200, वाटाणा पांढरा 4600-4700, काबुली चणा 7500-11000 रु.

  • साबुदाणा:- साबुदाणा नं.1 5000, साबुदाणा नं.2 4750, साबुदाणा नं.3 4500 रु.

  • वरई भगर:- 11000-13000, सावा भगर 10000-11000 रु. गोटा खोबरे 3200-3400 रु.

  • शेंगदाणा:- जाडा 11200-11800, स्पॅनिश13000-14000, घुंगरु 12500 टीजे 11000 रु.

  • धने:- गावरान 11000-12000, इंदूर 13000-15000 रु.

  • पोहे:- मध्य प्रदेश 4600-4900,पेण 4600-4800, मध्यम पोहा 4600-4800, दगडी पोहा 4800-5100, पातळ पांहा 5200-5800, सुपर पोहा 5200-5800, भाजका पोहा 650-750, मका पोहा 5500-650, भाजके डाळे 3200-3800, मुरमुरा सुरती (9किलोस) 560, भडंग 850-1100, घोटी 540 रु.

  • रवा, मैदा, आटा:- (50 किलोचा भाव) आटा 1750-1850, रवा 1800-1850, मैदा 1800-1850, बेसन:- (50 किलोस) 4150-4450 रु.

  • मीठ:- मीठ खडे (50किलोस) 300, मीठ दळलेले (50 किलोस) 350 रु.

  • मिरची:- काश्मीरी ढब्बी 5000-60000, ब्याडगी 35000-40000, लवंगी तेजा 21000-22000, गुंटूर 23000-25000, खुडवा गुंटूर 1100-13000, खुडवा ब्याडगी 14000-15000 रु.

  • नारळ:- (शेकडयाचा भाव): नवा पॅकिंग 2100-2300, मद्रास 4500-5000, पालकोल जुना 2500-2600, सापसोल 4500-5200 रु.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news