Mula Mutha River Trash Barrier: मुठा नदी प्रदूषणमुक्तीसाठी महापालिकेचा ‘ट्रॅश बॅरिअर’ निर्णय

भिडे पुलाजवळील प्रयोग यशस्वी; संपूर्ण ४४ किमी नदीपात्रात १०-१२ ठिकाणी बॅरिअर बसविण्याची तयारी
Mula Mutha River Trash Barrier
Mula Mutha River Trash BarrierPudhari
Published on
Updated on

पुणे: शहराची जीवनरेखा असलेल्या मुठा नदीला प्रदूषणमुक्त करण्यासाठी पुणे महानगरपालिका आता ठोस आणि तांत्रिक पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. नदीत तरंगणारा प्लास्टिक कचरा, प्लास्टिक बाटल्या, थर्माकोल आणि अन्य प्लास्टिक साहित्य अडविण्यासाठी नदीपात्रात ‌‘ट्रॅश बॅरिअर‌’ बसविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

Mula Mutha River Trash Barrier
Pune Smart Meter Savings Controversy: स्मार्ट मीटरमुळे बचत की फसवणूक? महावितरणच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह

बाबा भिडे पुलाजवळ एका खाजगी संस्थेने राबविलेल्या प्रयोगाला मिळालेल्या यशानंतर शहरातून वाहणाऱ्या सुमारे 44 किलोमीटरच्या मुठा नदीपात्रात विविध ठिकाणी असे बॅरिअर उभारण्याची योजना आखली जात आहे. यासाठी आगामी अर्थसंकल्पात निधीची तरतूद केली जाणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या पर्यावरण विभागाच्या उपायुक्त किशोरी शिंदे यांनी दिली. मुठा नदीत मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा, चप्पल, शालेय पिशव्या, प्लास्टिक बाटल्या तसेच विविध घरगुती टाकाऊ वस्तू फेकल्या जात आहेत. धार्मिक श्रद्धेच्या नावाखाली पूजासाहित्य, देवतांच्या मूर्ती आणि नारळ थेट नदीत विसर्जित केले जातात. हा सर्व कचरा पाण्याच्या प्रवाहासोबत पुढे सरकत संपूर्ण नदी प्रदूषित करीत आहे. परिणामी नदीचे पर्यावरणीय संतुलन धोक्यात आले आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या पर्यावरणाबाबतच्या सकारात्मक भूमिकेमुळे या उपक्रमासाठी आवश्यक निधीची तरतूद होईल, अशी पर्यावरणप्रेमींना अपेक्षा आहे.

Mula Mutha River Trash Barrier
Pune Airport Humanoid Robot: पुणे विमानतळावर भारताचा पहिला ह्युमनॉइड रोबोट ‘स्पेसियो एम 1’ तैनात

वर्शिप अर्थ फाउंडेशनचा प्रयोग यशस्वी

नदीतील वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी ‌‘वर्शिप अर्थ फाउंडेशन‌’ने बाबा भिडे पुलाजवळ ‌‘ट्रॅश बॅरिअर‌’ बसविले. या उपक्रमामुळे चार महिन्यांत जमा होणारा कचरा आता अवघ्या एका आठवड्यात गोळा होत असल्याचे समोर आले आहे. दर आठवड्याला तीन ते चार मोठे डंपर ट्रक कचरा नदीतून बाहेर काढला जात असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक पराग मते यांनी दिली. महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडून नदी प्रदूषण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. ट्रॅश बॅरिअरच्या यशस्वी प्रयोगानंतर आता संपूर्ण नदीपात्रात 10 ते 12 ठिकाणी असे बॅरिअर उभारण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

Mula Mutha River Trash Barrier
Purandar Toll Concession NH965: पुरंदरकरांना दिलासा! तक्रारवाडी टोलनाक्यावर २० किमी परिसराला सवलत

काय आहे ‌‘ट्रॅश बॅरिअर‌’?

ट्रॅश बॅरिअर म्हणजे नदीच्या पृष्ठभागावर बसविलेले तरंगते कुंपण. हे कुंपण नदीच्या प्रवाहात अशा प्रकारे बसविले जाते की पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अबाधित राहतो. मात्र, पृष्ठभागावर तरंगणारा प्लास्टिक, थर्माकोल, काचेच्या बाटल्या आणि इतर कचरा त्यात अडकतो. या बॅरिअरमध्ये साठलेला कचरा मशिन किंवा स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या मदतीने सहज गोळा करता येतो आणि त्याची योग्य विल्हेवाट लावता येते. विशेष म्हणजे, पाण्यात सुमारे सहा फूट खोलीपर्यंत वाहणारा कचराही या प्रणालीद्वारे अडवता येतो.

Mula Mutha River Trash Barrier
Chimbali Power Cut Issue: चिंबळीत वारंवार वीजपुरवठा खंडित; संतप्त नागरिकांचा महावितरणला इशारा

मुठा नदीतील प्रदूषण कमी करण्यासाठी भिडे पुलाजवळ बसविलेल्या ट्रॅश बॅरिअरमुळे अपेक्षेपेक्षा अधिक कचरा जमा होत आहे. दर आठवड्याला तीन ते चार डंपर कचरा बाहेर काढला जातो. संपूर्ण नदी प्रदूषित होण्यापासून वाचविण्यासाठी पुणे शहरात किमान 10 ते 12 ठिकाणी असे बॅरिअर बसविणे आवश्यक आहे.

पराग मते, संस्थापक, वर्शिप अर्थ फाउंडेशन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news