Pune Fish Market Prices: मासळी तेजीतच; चिकन, मटण आणि अंडी स्थिर

थंडीमुळे मासळी उपलब्धता कमी; खोल समुद्रातील मासळीचे दर उंच, खाडी व नदीची मासळी तुलनेने स्वस्त
Fish
Fish Pudhari
Published on
Updated on

पुणे: समुद्रात थंडीचा प्रभाव कायम असल्याने त्याचा परिणाम मासेमारीवर होत आहे. मुबलक मासळी उपलब्ध होत नसल्याने स्थानिक बाजारपेठेत मासळीला उंच बोली लागत आहे. त्यामुळे, शहरातील व्यापारी वर्गाकडून कमी प्रमाणात मासळी मागविण्यात येत आहे. दहावी आणि बारावीच्या परिक्षा सुरू असल्याने मासळी मागणी कमी आहे.

Fish
Mula Mutha River Trash Barrier: मुठा नदी प्रदूषणमुक्तीसाठी महापालिकेचा ‘ट्रॅश बॅरिअर’ निर्णय

देशाच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीहून गणेश पेठ येथील मासळी बाजारात मासळी दाखल होत आहे. रविवारी बाजारात (दि. 22) खोल समुद्रातील मासळी 10 ते 15 टन, खाडीच्या मासळीची सुमारे 200 ते 300 किलो आणि नदीच्या मासळीची 500 ते 700 किलो इतकी आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहू, कटला आणि सिलनची सुमारे 15 ते 20 टन इतकी आवक झाली होती.

Fish
Pune Smart Meter Savings Controversy: स्मार्ट मीटरमुळे बचत की फसवणूक? महावितरणच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर):

पापलेट : कापरी : 1800-2000, मोठे : 1700-1800, मध्यम : 1200-1400, लहान : 1100-1200, भिला : 700-800, हलवा : 700-800, सुरमई 800-1000, रावस : 800-1200, घोळ : 1000-1200, करली : 350-400, करंदी : 450-500, भिंग : 400-500, पाला : 1200-1400, वाम : पिवळी 800-1000, काळी : 400-500, ओले बोंबील : 300-350. कोळंबी : लहान : 250-400, मोठी : 450-600, जम्बो प्रॉन्स : 1400-1500, किंग प्रॉन्स : 800-900, लॉबस्टर : 1800-2000, मोरी : 350-400, मांदेली : 100-140, राणीमासा : 250-300, खेकडे : 300-400, चिंबोऱ्या : 600-800. खाडीची मासळी - सौंदाळे : 250-300, खापी : 250-300, नगली : 500-700, तांबोशी : 500-600, पालू : 250-300, लेपा : 350-400, बांगडा : 150-280, शेवटे : 250-300, पेडवी : 150, बेळुंजी : 150-200, तिसऱ्या : 250-300, खुबे : 150, तारली : 200-250. नदीतील मासळी : रहू : 160-180, कतला : 180-250, मरळ : 350-400, शिवडा : 200-250, खवली : 200-250, आम्ळी : 150-200, खेकडे : 250-400, चिलापी : 80-160, वाम : 550-600. मटण : बोकडाचे 800, बोलाईचे 800, खिमा 800, कलेजी 840. चिकन 240, लेगपीस 300, जिवंत कोंबडी 180, बोनलेस 340. अंडी : गावरान (शेकडा) 1220 डझन 150, प्रतिनग 14. इंग्लिश (शेकडा) 575, डझन 78, प्रतिनग 6.50.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news