Pune Wholesale Market Rates: घाऊक बाजारात साखर-गुळ दर तेजीत; हिरवा वाटाणा, हरभरा डाळ स्वस्त

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर साखरेला मागणी वाढली; वाटाणा दरात ८०० रुपयांची घसरण, हरभरा डाळ २०० रुपयांनी कमी
Green Peas
Green PeasPudhari
Published on
Updated on

पुणे: बाजारात आवक कमी असून, मागणी वाढल्याने गेल्या आठवड्यात गुळाच्या दरात मोठी वाढ झाली. अपुऱ्या कोट्यामुळे साखरेच्या दरातही क्विंटलमागे पन्नास रुपयांनी वाढ झाली. मात्र, आवक मुबलक असून, मागणी कमी असल्यामुळे हिरव्या वाटाण्याच्या दरातील घसरण सुरूच असून, दरात आणखी आठशे रुपयांनी घट झाली. हरभरा डाळीचे दरही आणखी दोनशे रुपयांनी कमी झाले. अन्य जिनसांचे दर स्थिर असल्याचे येथील घाऊक बाजारातून सांगण्यात आले.

Green Peas
Pune Fruit Market Rates: गुलटेकडी फळबाजारात आवक वाढली; कलिंगड-खरबूज स्वस्त, लिंबू महाग

केंद्र सरकारने मार्च महिन्यासाठी साडेबावीस लाख टन साखर खुली केली आहे. उन्हाचा कडाका वाढत असल्याने शीतपये उत्पादकांकडून यापुढे साखरेस मागणी अधिक राहील. तसेच होळी, गुढीपाडवा, रामनवमी हे महत्त्वाचे सण असल्यामुळे साखरेचा खप वाढणार आहे. हे लक्षात घेता जाहीर झालेला कोटा अपुरा असल्यामुळे कोट्याच्या घोषणेनंतर शनिवारी साखरेच्या दरात क्विंटलमागे पन्नास रुपयांनी वाढ झाली. येथील घाऊक बाजारात एस 30 साखरेचा प्रतिक्विंटलचा दर 4 हजार 25 ते 4 हजार 75 रुपये होता. उसाच्या कमतरतेमुळे बरीचशी गुऱ्हाळे बंद झाली असून, बाजारात गुळाची आवक एकदम मंदावली आहे. मात्र, होळी व गुढीपाडवा या सणानिमित्त गुळास मागणी चांगली आहे. यामुळे गेल्या आठवड्यात सर्व प्रकारच्या गुळाच्या दरात क्विंटलमागे दोनशे ते तीनशे रुपयांनी वाढ झाली.

Green Peas
Pune Market Yard Vegetable Rates: गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये भाजीपाला दर स्थिर; काकडी-ढोबळी मिरची महाग

हिरव्या वाटाण्याच्या दरातील घसरण कायम

उत्तर प्रदेशात यंदा हिरव्या वाटाण्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले असून, तेथून मुबलक प्रमाणात आवक होत आहे. यामुळे दरात घसरण सुरू आहे. गेल्या आठवड्यातही दरात क्विंटलमागे आणखी सातशे ते आठशे रुपयांनी घट झाली. नव्या हरभऱ्याची आवक वाढत असून, मागणी कमी आहे. यामुळे हरभरा डाळीच्या दरातही क्विंटलमागे दोनशे रुपयांनी घट झाली. आवक-जावक साधारण असल्यामुळे तूरडाळीसह अन्य सर्व डाळींचे दर टिकून होते. मटकी, काबुली चणा तसेच चवळीचे दरही स्थिर असल्याचे सांगण्यात आले. यंदा मिरचीचे उत्पादन घटले असून, दर तेजीतच आहेत. येथील बाजारात सध्या आवक कमी असून, मागणी चांगली आहे, यामुळे सर्व प्रकारच्या मिरचीचे दर तेजीत आहेत. धन्याच्या दरात क्विंटलमागे पाचशे रुपयांनी वाढ झाली.

Green Peas
Pune fish Market Rates: पुणे बाजारात मासळी दर तेजीतच; इंग्लिश अंडी स्वस्त

येथील घाऊक बाजारातील शनिवारचे दर पुढीलप्रमाणे होते:

साखर (प्रतिक्विंटल) 4025-4075 रु. खाद्यतेले (15किलो/लिटर) : शेंगदाणा तेल 2550-2730, रिफाईंड तेल 2150-3050, सरकी तेल 1980-2280, सोयाबीन तेल 1950-2220, पामतेल 1900-2100, सूर्यफूल रिफाईंड तेल 2160-2280, खोबरेल तेल 4300 वनस्पती 1820-2280 रु. तांदूळ:- गुजरात उकडा 3500-4000, मसुरी 3500-4000, सोना मसूरी 4500-5000, एच.एम.टी. कोलम 5500-6500, लचकारी कोलम 6500-7000, चिन्नोर 4500-5000, 1121-11000-11500, आंबेमोहर (सुवासिक) 14000-16000, बासमती अखंड 12000-13000, बासमती दुबार 9500-1000, बासमती तिबार 10000-10500, बासमती मोगरा 5500-6500, बासमती कणी 4000-4500, 1509-8500-9500, इंद्रायणी 5500-6000 रु. गहू - लोकवन नं. 1 4050-4250, लोकवन नं. 2 3650-4050, नं.3 3350-3650, सिहोर नं. 1 5700- 6000, सिहोरी 3850-4450, मिलबर 3250-3300 रु. ज्वारी :- गावरान नं. 1 5700-6200, गावरान नं.2 5200-5500, नं.3 4700-5100, दूरी नं.1 3800-4000, दूरी नं. 2 3500-3700 रु बाजरी:- महिको नं.1 4000-4200, महिको नं.2 3600-3800, गावरान 3300-3500, हायब्रीड 3200-3300 रु. गूळ :- गूळ नं. 1 4400-4600, गूळ नं.2 4200-4300 गूळ नं.3 4050-4150, नं. 4 - 3900-4000, बॉक्स 4000-5200 रु. डाळी:- तूरडाळ 10000-13000, हरभराडाळ 6800-6900, मूगडाळ 9800-10000, मसूरडाळ 7200- 7300, मटकीडाळ 8300-8400, उडीदडाळ 10000-12000 रु. कडधान्ये:-हरभरा 6000-6300, हुलगा 5000-5200 चवळी 7000-10000, मसूर 6600-6700, मूग 9000- 9500, मटकी गावरान 12000, मटकी पॉलिश 6800-7000, मटकी गुजरात 6800-7000, मटकी राजस्थान 6800-7000, मटकी सेलम 16000-16500, वाटाणा हिरवा 6000-6200, वाटाणा पांढरा 4600-4700.

Green Peas
Dubai Real Estate Investment: इराण–अमेरिका तणावाचा दुबई रिअल इस्टेटवर परिणाम? पुणेकर गुंतवणूकदार सावध

शेंगदाणा तेलाच्या दरात घसरण

नाफेडने यंदा सुमारे 18 लाख टन भूईमूग शेंगेची खरेदी केली आहे. येत्या 4 मार्चपासून नाफेडकडून खुल्या बाजारात निविदेद्वारे भूईमूग शेंगेची विक्री करण्यात येणार आहे. यामुळे शेंगदाणा आणि शेंगदाणा तेलाच्या दरवाढीस आळा बसला आहे. या वृत्तामुळे गेल्या आठवड्यात शेंगदाणा तेलाच्या दरात 15 किलामागे सुमारे शंभर रुपयांनी घट झाली. यामुळे अन्य खाद्यतेलांच्या दरातही डब्यामागे पंधरा ते वीस रुपयांनी वाढ झाली. मात्र, आवक कमी असल्याने सूर्यफूल तेलाच्या दरात काही प्रमाणात वाढ झाली. खोबऱ्याचा नवा हंगाम सुरू झाल्यामुळे खोबरेल तेलाच्या दरात 15 किलोच्या डब्यामागे दोनशे रुपयांनी घट झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news