Pune Market Yard Vegetable Rates: गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये भाजीपाला दर स्थिर; काकडी-ढोबळी मिरची महाग

बटाटा, घेवडा व तोतापुरी कैरी 10–20% स्वस्त; वाढत्या मागणीमुळे काकडी-ढोबळी मिरचीच्या भावात वाढ
Raw Mango
Raw MangoPudhari
Published on
Updated on

शंकर कवडे

पुणे: कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डातील तरकारी विभागात फळभाज्यांची आवक मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर राहिली. बाजारात दाखल झालेल्या मालाच्या तुलनेत मागणी कमी पडल्याने बटाटा, घेवडा आणि तोतापुरी कैरीच्या भावात दहा ते वीस टक्क्यांनी घसरण झाली.

Raw Mango
Pune fish Market Rates: पुणे बाजारात मासळी दर तेजीतच; इंग्लिश अंडी स्वस्त

तर, मागणी वाढल्याने काकडी आाणि ढोबळी मिरचीच्या भावात वाढ झाली आहे. मागणी आणि पुरवठा, यातील समतोलामुळे उर्वरित फळभाज्यांचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर राहिल्याचे सांगण्यात आले.

Raw Mango
Dubai Real Estate Investment: इराण–अमेरिका तणावाचा दुबई रिअल इस्टेटवर परिणाम? पुणेकर गुंतवणूकदार सावध

राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून मिळून सुमारे 90 ते 100 ट्रक फळभाज्यांची आवक झाली. ही आवक मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर राहिली. परराज्यांतून झालेल्या आवकमध्ये कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश येथून हिरवी मिरची सुमारे 14 ते 15 टेम्पो, कर्नाटक येथून कोबी 4 ते 5 टेम्पो, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून शेवगा 4 ते 5 टेम्पो, राजस्थान येथून गाजर सुमारे 6 ते 7 टेम्पो, मध्य प्रदेश येथून मटार 14 ते 15 टेम्पो, कर्नाटक येथून घेवडा 3 ते 4 टेम्पो, भुईमूग शेंग कर्नाटक आणि गुजरात येथून प्रत्येकी 3 टेम्पो, कर्नाटक येथून पावटा 3 ते 4 टेम्पो, तामिळनाडू येथून तोतापुरी कैरी 2 ते 3 टेम्पो, मध्य प्रदेश येथून लसणाची सुमारे 14 ते 15 टेम्पो, तर इंदूर, आग्रा आणि स्थानिक भागातून मिळून बटाट्याची 30 ते 35 टेम्पो इतकी आवक झाली होती.

Raw Mango
Chakan Extortion Case: चाकणमध्ये धक्कादायक प्रकार; बलात्काराची तक्रार देण्याची धमकी देत 3 लाख व फ्लॅटची मागणी

स्थानिक भागातून झालेल्या आवकमध्ये सातारी आले सुमारे 700 ते 800 गोणी, भेंडी 6 ते 7 टेम्पो, गवार 4 ते 5 टेम्पो, टोमॅटो 8 ते 10 क्रेट, हिरवी मिरची 4 ते 5 टेम्पो, काकडी 6 ते 7 टेम्पो, फ्लॉवर 10 ते 12, कोबी 10 ते 12 टेम्पो, ढोबळी मिरची 8 ते 10 टेम्पो, तांबडा भोपळा 14 ते 15 टेम्पो, गाजर 2 ते 3 टेम्पो, घेवडा 3 ते 4 टेम्पो, पावटा 3 ते 4 टेम्पो, कांदा सुमारे 100 ते 125 टेम्पो इतकी आवक झाल्याची माहिती मार्केट यार्डमधील ज्येष्ठ आडते विलास भुजबळ यांनी दिली.

Raw Mango
PMC Water Supply Projects: पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा योजना रखडल्या; नागरिक टँकरवरच अवलंबून

मेथी, चाकवत, हरभरा गड्डी आणि अंबाडीच्या भावात घट

बाजारात पालेभाज्यांची आवक मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहे. आवकेच्या तुलनेत मागणी अधिक असल्यामुळे मेथी, हरभरा गड्डी, चाकवत आणि अंबाडीच्या भावात वाढ झाली आहे. मेथीच्या जुडीच्या भावात घाऊक बाजारात सर्वाधिक 4 रुपयांनी वाढ झाली आहे. याबरोबरच हरभरा गड्डीच्या भावात 3 रुपये, चकवत आणि अंबाडीच्या भावात प्रत्येकी 1 रुपयाने वाढ झाली आहे. मागणी आणि पुरवठा, यातील समतोलामुळे उर्वरित पालेभाज्यांचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत. रविवारी (दि. 1) पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची सुमारे दीड लाख जुडी, तर हरभरा गड्डीची 8 ते 10 हजार जुडीची आवक झाली आहे. मेथीची आवक मात्र वाढली आहे. मागील आठवड्यात 70 हजार जुडी झालेल्या मेथीची आज 80 हजार जुडी आवक नोंदविण्यात आली. आवक वाढूनही मेथीच्या भावात वाढ झाली आहे. घाऊक बाजारात कोथिंबीर आणि मेथीच्या जुडीला अनुक्रमे 8 ते 15 आणि 8 ते 12 रुपये भाव मिळला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news