Pune Water Cut: पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट; २४ टीएमसी साठ्यातून मिळणार केवळ ७ टीएमसी पाणी!

दिवाळीनंतर दिवसाआड पाणीपुरवठ्याची वेळ; कालवा समितीच्या निर्णयावरून लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
Water Supply
Water SupplyPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: खडकवासला धरणसाखळीत तब्बल २४ अब्ज घनफूट म्हणजे २४ टीएमसी पाणी शिल्लक आहे. तरीही ६५ लाखांवरील पुणेकरांना पुढील वर्षाच्या ३० जूनपर्यंत त्यातले फक्त सात टीएमसीच पाणी देण्याचा अन्यायकारक निर्णय कालवा समितीच्या बैठकीने घेतला.

Water Supply
Ghorawadi Dam Water Shortage: पुरंदरच्या घोरवडी धरणातील पाणीउपशावर नियंत्रणाची मागणी; ४० ते ५० पंपांद्वारे उपसा होत असल्याचा आरोप

पुणेकरांच्या हिताची बाजू मांडण्याची जबाबदारी असणारे मंत्री आणि काही आमदारांनी बैठकीकडे पाठ फिरवली, तर उपस्थित आमदारांनी मिठाची गुळणी धरल्याने दिवाळीनंतर दिवसाआड पाणी देण्याचा निर्णय महापालिकेला करावा लागला. यानंतर तरी पुण्याच्या सर्वच लोकप्रतिनिधींनी याविरोधात ठोस-आक्रमक भूमिका घेतली नाही तर पुणेकरांचे हाल होणार आहेत.

Water Supply
Diwali Faral Price Hike: भाववाढीमुळे दिवाळीचा फराळ यंदा खिशाला जड! फराळ साहित्याचे बजेट २० ते ३० टक्क्यांनी वाढले

सध्या शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये सुमारे २४ टीएमसी पाणीसाठा आहे. मात्र, त्यातून शेती, पुढील भागातील पिण्याच्या पाण्याची गरज, बाष्पीभवन आणि पाणीगळती यांच्यासाठी तब्बल १७ टीएमसी पाणी राखून ठेवण्यात येईल, असा या नियोजनाचा अर्थ होतो. हे वाटत विसंगत, अन्यायकारक आणि विषम असल्याचे भान पुण्याच्या एकाही लोकप्रतिनिधीला अद्याप नसल्याचे त्यांच्याशी बोलता स्पष्ट झाले. त्यामुळे पुण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Water Supply
Pune Police Suspended: कर्तव्यात कसूर करणाऱ्यांना पोलिस आयुक्तांचा दणका; दोन अधिकाऱ्यांसह तिघांचे तडकाफडकी निलंबन

महापालिकेच्या भांडवली कामांनाही कात्री?

पाणीटंचाईची तीव्रता वाढल्यास त्याचा परिणाम महापालिकेच्या आर्थिक नियोजनावरही होण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या अंदाजपत्रकात मोठ्या प्रमाणावर भांडवली कामे प्रस्तावित आहेत. एचसीएमटीआर, उड्डाणपूल यांसारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्पही सुरू आहेत. मात्र, दुष्काळी परिस्थितीमुळे पाणीपुरवठा आणि टंचाई निवारणासाठी अधिक निधीची आवश्यकता भासल्यास या कामांच्या खर्चाला कात्री लावावी लागू शकते. सत्ताधारी आणि प्रशासनाला याबाबत आर्थिक प्राधान्यक्रम बदलण्याची वेळ येण्याची शक्यता आहे.

Water Supply
Shirur accident news: कीर्तनाहून घरी परतताना काळाचा घाला; आंबळे अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

शहराला मंजूर कोट्यापैकी ६.३५ टीएमसी पाणी वापरण्यात आले असून, ३० जूनपर्यंत केवळ ७.१५ टीएमसी पाणी शिल्लक राहणार आहे. प्रत्यक्ष गरजेच्या तुलनेत उपलब्ध पाणी कमी असल्याने दिवाळीनंतर एक दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागणार आहे. याबाबत महापौर आणि सर्व पक्षनेत्यांची बैठक घेऊन निर्णय करण्यात येईल. सर्व भागांना समान दाबाने पाणीपुरवठा करण्यासह पाणीबचतीसाठी प्रयत्न केले जातील. नागरिकांचे सहकार्यही आवश्यक आहे.

पवनीत कौर, अतिरिक्त महापालिका आयुक्त

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.