Pune Police Suspended: कर्तव्यात कसूर करणाऱ्यांना पोलिस आयुक्तांचा दणका; दोन अधिकाऱ्यांसह तिघांचे तडकाफडकी निलंबन

३० लाखांच्या हवालाप्रकरणात गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ, तपासातील त्रुटी आणि मद्यप्राशन करून वाहन चालवल्याप्रकरणी कारवाई
Police
PolicePudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: कर्तव्यात कसूर करणाऱ्या दोन पोलिस अधिकाऱ्यांसह तिघांचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी निलंबन केले आहे.

त्यामध्ये मार्केट यार्ड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजित जगताप, फुरसुंगी पोलिस ठाण्याच्या महिला पोलिस उपनिरीक्षक कोमल जाधव आणि दारूच्या नशेत टल्ली झालेल्या महिला पोलिस हवालदार अश्विनी केकान यांचा समावेश आहे. दरम्यान, अमितेश कुमारांच्या या थेट कारवाईमुळे शहर पोलिस दलात चांगलीच खळबळ उडाली आहे.

मार्केटयार्ड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजित जगताप यांना ३० लाखांचे हवालाप्रकरण भोवले असून, त्यांना पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.

पंधरा दिवसांपूर्वी (दि. ७ ऑक्टोबर) दुपारी फिर्यादी श्रवण देवासी व साथीदार गणपत देवासी हे दुचाकीवरून जात असताना पाच जणांनी ३० लाख रुपये असलेली बॅग त्यांच्या तोंडावर स्प्रे मारून हिसकावून पळ काढला होता.

Police
DSK Depositors Refund: डीएसके ठेवीदारांना परतावा मिळण्यास पुन्हा अडथळा; १९५ मालमत्तांच्या लिलावाचा अर्ज फेटाळला

या प्रकारानंतर मार्केटयार्ड पोलिसांना ही माहिती दिल्यानंतर उपनिरीक्षक अक्षयकुमार गडगडे व कर्मचारी तेथे आले. घटनेची माहिती घेऊन ते पुन्हा पोलिस ठाण्यास गेले. त्या वेळी पोलिसांनी त्यांची तक्रार एका कागदावर लिहून घेतल्यानंतर कॅमेरे पाहून तुमचा गुन्हा दाखल करू असे सांगितले.

नंतर अऩेकदा तक्रार दाखल करण्यासाठी पोलिस ठाण्यांच्या चकरा मारल्या. पण, अधिकाऱ्यांनी त्यांचा दरोड्याचा गुन्हा दाखल न करता केवळ प्रॉपर्टी मिसिंगची तक्रार दाखल करून घेतली. हा प्रकार पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या काणावर पडल्यानंतर त्यांनी बेशिस्तपणाचे वर्तन तसेच बेजबाबदारपणा दिसून आला. तर शिस्तप्रिय पोलिस दलाची प्रतिमा मलिन केल्याने वरिष्ठ निरीक्षक विश्वजीत जगताप यांचे निलंबन केले आहे.

Police
Pune Water Planning: पिण्याचे आणि शेतीच्या पाणी नियोजनासाठी समन्वयाने काम करा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सूचना

महिला पोलिस उपनिरीक्षक निलंबित

फुरसुंगी पोलिस ठाण्यात कर्तव्यास असलेल्या महिला पोलिस उपनिरीक्षक कोमल कचरू जाधव यांचे निलंबन केले आहे. अपर पोलिस आयुक्त राजेश बनसोडे यांनी निलंबनाचे आदेश दिले आहेत. एका गंभीर गुन्ह्यांचा तपास त्यांच्याकडे असताना त्यांनी तपासात गंभीर त्रुटी ठेवून अक्ष्यम चुका केल्याप्रकरणी त्यांचे निलंबन केले आहे.

याचप्रकरणात आरोपीने उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज सादर केल्यानंतर तपासी अधिकारी म्हणून त्रोटक व मोघम स्वरूपाचा अहवाल न्यायालयात सादर केला. तसेच, सुनावणीसाठी स्वत: न्यायालयात हजर राहणे अपेक्षित असताना उपस्थित न राहिल्याने पोलिस आयुक्तांनी निलंबनाची कारवाई केली असल्याचे आदेशात म्हटले आहे.

टल्ली महिला हवालदारावरही कारवाई

मद्यप्राशन करून कार विरुद्ध दिशेने चालवून तसेच फुटपाथवर धडकवून नागरिकांना व इतर वाहनचालकांना शिवीगाळ केल्याप्रकरणात महिला पोलिस हवालदार अश्विनी केकान यांना निलंबित केले आहे.

दरम्यान, या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर केकान यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. पोलिस उपायुक्त जीवन बेनिवाल यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. केकान या काळेपडळ पोलिस ठाण्यात नेमणुकीस आहेत. त्या दोन दिवस रजेवर असताना ही घटना घडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.