Pune Water Robot Technology: रोबोट शोधणार अनधिकृत नळजोड अन्‌‍ पाण्याची गळती

महापालिकेचा अभिनव उपक्रम
Pune Water Robot Technology
रोबोट शोधणार अनधिकृत नळजोड अन्‌‍ पाण्याची गळतीPudhari
Published on
Updated on

पुणे : शहरातील अनधिकृत नळजोड शोधण्यासाठी पुणे महापालिकेने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत महापालिकेने भाडेतत्त्वावर रोबोट आणून पाणीपुरवठा यंत्रणेचे निरीक्षण केले.(Latest Pune News)

Pune Water Robot Technology
Andekar Gang Arrest Pune: कुख्यात आंदेकर टोळीतील दोघा सराईतांना अटक

या रोबोटच्या साहाय्याने वडगावशेरीतील गणेशनगर भागात 500 मिलिमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीत तब्बल 300 मीटर आत जाऊन 40 अनधिकृत नळजोड शोधण्यात आले आहेत. महापालिका आता स्वतःचा एक रोबोट खरेदी करण्याच्या तयारीत आहे. या अत्याधुनिक उपकरणाची किंमत सुमारे 90 लाख रुपये असून, तीन वर्षांचा देखभाल खर्च आणि मनुष्यबळासह एकूण किंमत दीड कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

Pune Water Robot Technology
Pune Municipal Election Voter List: महापालिका निवडणुकांसाठी विधानसभा निवडणुकीची मतदारसंख्या ठरणार ग्राह्य

महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या 23 गावांपैकी 11 गावांमध्ये तसेच जुन्या हद्दीतील काही भागांमध्ये भोगवटापत्र आणि गुंठेवारी दाखला नसलेली बांधकामे मोठ्या प्रमाणात आहेत. आवश्यक कागदपत्रे नसल्याने अनेक नागरिक अधिकृत नळजोड घेऊ शकत नाहीत, परिणामी, अनधिकृत जोडणीचे प्रमाण वाढले आहे. यामुळे महापालिकेला महसुली तोटा सहन करावा लागतो, तसेच नागरिकांना प्रतिमाणशी किती पाणी मिळते, याचे अचूक मोजमाप करणेही अशक्य ठरते.

Pune Water Robot Technology
Janata Vasahat Slum Rehabilitation: जनता वसाहतीतून फक्त 885 झोपडपट्टीधारक पात्र; उर्वरित 1,827 अपात्र

महापालिकेच्या मते, नागरिकांना अधिकृत नळजोड दिल्यास अनधिकृत जोड कमी होतील आणि महसूल वाढीस मदत होईल. याशिवाय, अनेक ठिकाणी होणारी पाणी गळती शोधणे अवघड जात असल्याने रोबोटचा वापर उपयुक्त ठरत आहे. हा रोबोट रिमोटद्वारे नियंत्रित केला जातो. त्याला चार चाके, उच्च क्षमतेचा कॅमेरा आणि प्रकाशयंत्र बसविण्यात आले आहेत. जलवाहिनीत सोडल्यावर तो आतील भागाचे निरीक्षण करतो आणि ते थेट स्क्रीनवर दृश्य स्वरूपात पाहता येते.

Pune Water Robot Technology
World Mental Health Day: आपत्ती काळात सुलभ व्हाव्यात मानसिक आरोग्यसेवा

वडगावशेरी गणेशनगर येथे मुख्य जलवाहिनीत रोबोट उतरविण्यात आला असता दोन ठिकाणी गळती आणि तब्बल 40 बेकायदा नळजोड आढळून आल्या. या वेळी पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता वीरेंद्र केळकर, कार्यकारी अभियंता एकनाथ गाडेकर, तसेच कनिष्ठ अभियंते नितीन जाधव, रवींद्र वानखेडे आणि रामदास आढारी उपस्थित होते.

Pune Water Robot Technology
Pune Unauthorized Flex Crackdown: अनधिकृत फ्लेक्सबाजांवर कारवाई; मात्र नेत्यांना अभय!

रोबोटच्या साहाय्याने अनधिकृत नळजोड आणि जलवाहिनीतील गळती लवकर शोधता येते. पुणे महापालिका लवकरच स्वतःचा रोबोट खरेदी करणार आहे. या रोबोटची किंमत सुमारे 90 लाख रुपये असून, तीन वर्षांचा देखभाल खर्च आणि मनुष्यबळासह किंमत दीड कोटींपर्यंत जाईल. या खरेदीसाठी लवकरच निविदा काढली जाणार आहे.

नंदकिशोर जगताप, पाणीपुरवठा विभागप्रमुख, पुणे महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news