Pune Drone Food Processing Cluster: पुण्यात ड्रोन व अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान क्लस्टरची शिफारस; उद्योगवृद्धीसाठी मोठे पाऊल

एमसीसीआयएकडून सामाईक सुविधा केंद्राचा प्रस्ताव; 2027 पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन
Pune Drone Food Processing Cluster
Pune Drone Food Processing ClusterPudhari
Published on
Updated on

पुणे : शहरातील औद्योगिक आणि तांत्रिक क्षेत्राला बळ देण्यासाठी पुण्यात ड्रोन आणि खाद्य प्रक्रिया तंत्रज्ञानासाठी सर्व सोयीसुविधांनी युक्त सामाईक सुविधा केंद्र उभारणे गरजेचे आहे. त्यासाठी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग््रािकल्चरने (एमसीसीआयए) पुढाकार घेतला आहे. या प्रकल्पाचा सविस्तर अहवाल लवकरच उद्योग खात्याकडे मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे.

Pune Drone Food Processing Cluster
Mumbai Climate Week: भित्तिचित्राच्या माध्यमातून वातावरण बदलाबाबत जनजागृती

राज्याच्या उद्योग खात्याने मंजुरी दिल्यानंतर केंद्र शासनाच्या सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रालयाची अंतिम मंजुरी, निधीवितरण, प्रकल्पासाठी आवश्यक असणाऱ्या यंत्रसामग््राीसाठी निविदा प्रक्रिया, सॉफ्टवेअर कामकाज करण्यासाठी मनुष्यबळ आणि मार्गदर्शक तज्ज्ञांची निवड, असे यापुढील टप्पे असतील.

Pune Drone Food Processing Cluster
Protest Against Harshavardhan Sapkal: भाजयुमोची दादरमध्ये हर्षवर्धन सपकाळांविरोधात तीव्र निदर्शने

मार्च 2027 पर्यंत दोन्ही प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचे नियोजन आहे. त्यासाठी शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी एमसीसीआयए संपर्कात आहे. मायक्रो अँड स्मॉल एंटरप्रायजेस क्लस्टर डेव्हलपमेंट प्रोग््रॉम (एमएसई-सीडीपी) योजनेअंतर्गत 10 कोटी रुपयांपर्यंतच्या प्रकल्पाच्या खर्चातील प्रमुख वाटा केंद्र आणि राज्य सरकार संयुक्तरीत्या उचलते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news