Pune Municipal Election Analysis: प्रभाग 9 सुस-बाणेर-पाषाणमध्ये अटीतटीची लढत; भाजप-राष्ट्रवादी 2-2

हाय व्होल्टेज सामन्यात कार्यकर्त्यांचा विजय, नेत्यांना धक्का; नव्या गावांच्या मतांनी निकालाला कल
Election Analysis
Election AnalysisPudhari
Published on
Updated on

मोहसीन शेख

बाणेर: पुणे महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग 9 सुस- बाणेर- पाषाण या ठिकाणी ‌‘हाय व्होल्टेज‌’ लढतीवर पुणे शहराचेच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. निवडणुकीच्या सुरुवातीपासून रंगतदार पद्धतीने सुरू झालेला हा सामना अखेर दोन भाजप दोन राष्ट्रवादी सुटला.

Election Analysis
Solar Storm 2026: 11 वर्षांतील सर्वात मोठे सौरवादळ; पुण्यात दुर्बिणीतून सूर्यावरील डागांचे दर्शन

नेता विरुद्ध कार्यकर्ता लढतीत मात्र नागरिकांनी कार्यकर्त्याला विजयी केला. तर राष्ट्रवादीत मात्र पुन्हा नेत्याचाच विजय झाला. या प्रभागात दोन्ही पुरुषांनी मात्र आपले नगरसेवक पद कायम राखले. प्रभागात भाजपची सरशी असतानाही या ठिकाणी नेत्यांकडून झालेल्या चुकीमुळे भाजपला दोन जागा गमवाव्या लागल्याची खंत येथील कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे. प्रभाग क्रमांक 9 मध्ये भाजपच्या दोन महिला रोहिणी चिमटे व मयुरी कोकाटे तर राष्ट्रवादीचे दोन पुरुष बाबुराव चांदेरे अमोल बालवडकर हे या महापालिका निवडणुकीत निवडून आले.

Election Analysis
Pune Illegal Country-Made Pistols: पुण्यात गावठी पिस्तुलांचा धंदा उघड! उमरटी कनेक्शन उघडकीस, टोळीचा पर्दाफाश

अटीतटीच्या झालेल्या पुरुष गटाच्या लढतीमध्ये राष्ट्रवादीचे बाबुराव चांदेरे 1411 मतांनी भाजपचे गणेश कळमकर यांच्याविरुद्ध निवडून आले. तर उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तिकीट नाकारल्यावर राष्ट्रवादीतून निवडणूक लढवलेल्या अमोल बालवडकर हे 903 मतांनी भाजपचे लहू बालवडकर यांच्याविरुद्ध निवडून आले. भाजपमधून रोहिणी चिमटे यांनी 41980 प्रभागातील सर्वात जास्त मत घेत 9361 मतांनी राष्ट्रवादीच्या गायत्री मेढे कोकाटे यांच्या विरुद्ध निवडून आल्या. भाजपाच्या दुसरी महिला मयुरी कोकाटे यांनी प्रभागात सर्वाधिक मताधिक्यात घेत 10225 मतांनी राष्ट्रवादीच्या पार्वती निम्हण यांच्याविरुद्ध निवडून आल्या.

Election Analysis
Maharashtra Government Hospital Charges: शासकीय रुग्णालयांत उपचारांना दर निश्चित; मोफत आरोग्यसेवेचा शेवट?

प्रभाग नऊमध्ये सुरुवातीपासून भाजपचा पगडा जड असताना या ठिकाणी एसटी प्रवर्गाच्या राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका रोहिणी चिमटे यांनीही निवडणुकीच्या काही दिवसापूर्वी भाजपमध्ये प्रवेश करून प्रभागातील भाजपचा विजयाचा मार्ग सुकर केला होता. उमेदवारी जाहीर होण्याआधी राष्ट्रवादीमध्ये तुल्यबळ उमेदवार असूनही गटबाजीचा फटका राष्ट्रवादीला बसणार हे दिसत होते. राष्ट्रवादी स्वतःच्याच गटबाजीमध्ये मागे पडत असताना अमोल बालवडकर यांची उमेदवारी भाजपाने नाकारावी आणि थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे जाऊन अमोल बालवडकर यांनी उमेदवारी आणून राष्ट्रवादीचे पारडे एक प्रकारे जड करून ठेवले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे तुल्यबळ असे माजी नगरसेवक प्रमोद निम्हण यांची ओबीसी पुरुष गटातून उमेदवारी पक्षाने नाकारली यामुळे प्रमोद निम्हण यांनी अपक्षाची वाट निवडली. तर पुणे शहर राष्ट्रवादी कार्याध्यक्षा पूनम विधाते यांची उमेदवारी पक्षाने नाकारल्याने त्या महिला सर्वसाधारण गटांमध्ये अपक्ष म्हणून उभ्या राहिल्या होत्या. पूनम विधाते व प्रमोद निम्हण यांनी अपक्षाची वाट निवडली व दोघांनीही जवळपास 15 हजारावर मतदान मिळवले.

Election Analysis
Pudhari Rise Up Women Athletics Pune: पुण्यात ‘पुढारी राईज अप महिला ॲथलेटिक्स’ स्पर्धेत युवतींचा दमदार जलवा

पुरुष गटामध्ये भाजपचे लहू बालवडकर व राष्ट्रवादीतून अमोल बालवडकर यांची सरळ सरळ लढत झाली. यात अमोल बालवडकर यांना त्यांच्या जुन्या भाजपच्या व संघाच्या मतदारांचा व राष्ट्रवादीचे बाबुराव चांदेरे यांच्या मतदानाचा फायदा झाल्याचे लक्षात येते. लहू बालवडकर यांनी पक्ष संघटन वाढवून केलेल्या कामाचा फायदा त्यांना झाला परंतु 903 मतांचा फरक मात्र ते गाठू शकले नाहीत. दुसऱ्या पुरुष गटामध्ये भाजपचे गणेश कळमकर यांनी राष्ट्रवादीच्या बाबुराव चांदेरे विरोधात चांगली लढत दिली. या गटामध्येच अपक्ष प्रमोद निम्हण व राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून जयेश मुरकुटे उभे होते. ते कोणाचे मते खाणार व कोणाला फटका बसणार याबाबत चर्चा सुरू होती.

सुस म्हाळुंगे गावातील मते पुरुष गटासाठी राष्ट्रवादीच्या पथ्यावर

नव्याने समाविष्ट झालेल्या या गावांमध्ये राष्ट्रवादीला मोठ्या प्रमाणात मतदान झाले. पुरुष गटातील भाजपचे दोन्ही उमेदवार लीडवर असताना या गावातील मतमोजणी शेवटी सुरू झाल्यावर दोघांनाही पिछाडीवर टाकत राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी विजय मिळवला. बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी भागाने मात्र भाजपला मोठ्या प्रमाणात मतदान केल्याने या ठिकाणी भाजपाला लीड मिळाले. राष्ट्रवादी व भाजप राज्यात एकत्र असल्याने दोन भाजप दोन राष्ट्रवादी असा पॅटर्न सोसायटी वर्गातील दिसून आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news