Solar Storm 2026: 11 वर्षांतील सर्वात मोठे सौरवादळ; पुण्यात दुर्बिणीतून सूर्यावरील डागांचे दर्शन

‘आदित्य एल-1’ मुळे सौरवादळाची स्पष्ट छायाचित्रे; केसरीवाड्यावर विद्यार्थ्यांची खगोलशाळा
Solar Storm 2026
Solar Storm 2026Pudhari
Published on
Updated on

पुणे: सूर्यावरील वादळ गुरुवारी अवघ्या जगाने अनुभवले. 11 वर्षांनी यंदा सर्वात मोठे वादळ सुरू झाले आहे. त्याचा थरार दुर्बिणीच्या साहाय्याने शास्त्रज्ञांसह विद्यार्थांनी टिपला आहे. पुण्यातील केसरीवाड्यावरील दुर्बिणीतून मुलांनी सूर्यावरील मोठे डाग पाहिले. ‌‘आदित्य एल-1‌’ या उपग््राहामुळे यंदाच्या सौरवादळाची स्पष्ट छायाचित्रे टिपता आली.

Solar Storm 2026
Pune Illegal Country-Made Pistols: पुण्यात गावठी पिस्तुलांचा धंदा उघड! उमरटी कनेक्शन उघडकीस, टोळीचा पर्दाफाश

फेबुवारीच्या पहिल्या आठवड्यात सूर्यावरील वादळे होणार असल्याचे भाकित शास्त्रज्ञांनी दिले होते. त्याप्रमाणे 5 फेबुवारी 2026 रोजी दुपारी 4 ते 6 दरम्यान सूर्यावरील मोठे डाग विद्यार्थ्यांना दुर्बिणीतून पाहता आले, तर नासा, इस्रोतील शास्त्रज्ञांनी याची चित्रे टिपली. यंदा ‌‘आदित्य एल-1‌’ या सूर्यासाठी पाठवलेल्या उपग््राहाने या वादळाची अधिक स्पष्ट प्रतिमा टिपण्यात यश मिळवले.

Solar Storm 2026
Maharashtra Government Hospital Charges: शासकीय रुग्णालयांत उपचारांना दर निश्चित; मोफत आरोग्यसेवेचा शेवट?

शास्त्रज्ञांनी या घटनेचे वर्णन आतापर्यंतचा सर्वात प्रबळ स्फोट असे केले असून, यातून बाहेर पडलेले ऊर्जावान कण पृथ्वीच्या दिशेने येत आहेत. ज्यामुळे उपग््राह, रेडिओ दळणवळण आणि पॉवर ग््राीडवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली आहे. सूर्यावरील डाग (सनस्पॉट) हा शास्त्रज्ञांच्या भाषेत सूर्याचा विभाग 4366 मधून हा स्फोट झाला. जो अत्यंत अस्थिर असल्याचे सांगण्यात येते.

केसरीवाड्यावर भरली खगोलप्रेमींची शाळा

पुण्यातील केसरीवाड्याच्या टेरेसवरील खगोल शाळेत ज्योतिर्विद्या परिसंस्थेच्या वतीने गुरुवारी दुपारी 4 ते सायंकाळी 6 पर्यंत दुर्बिणीच्या साहाय्याने सूर्याच्या पृष्ठभागावरील सौरडाग विद्यार्थ्यांना दाखविण्यासाठी विशेष आयोजन केले होते. विविध वयोगटांतील विद्यार्थ्यांनी दुर्बिणीतून सौरडाग पाहण्यासाठी गर्दी केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news