

बाणेर : पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ९ मधून कप बशी चिन्हावर अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असलेल्या पूनम विशाल विधाते यांच्या पाठीशी महिलांची मोठी आणि संघटित ताकद उभी राहिल्याचे चित्र दिसून येत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून वामा वुमन्स क्लबच्या माध्यमातून पूनम विधाते यांनी महिलांसाठी विविध सामाजिक, आरोग्यविषयक, शैक्षणिक व सक्षमीकरणाचे उपक्रम राबवले आहेत. या सातत्यपूर्ण कार्यामुळे परिसरातील महिलांमध्ये त्यांच्याविषयी विश्वास आणि आपुलकी निर्माण झाली असून, त्याचा थेट परिणाम निवडणूक प्रचारात दिसून येत आहे. महिला सक्षमीकरणासाठी सातत्याने प्रयत्न करणार असल्याचे प्रचारादरम्यान पुनम विधाते यांनी सांगितले.
महिलांच्या आरोग्य व फिटनेससाठी पूनम विधाते यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या महिला मॅरेथॉन स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला होता. या स्पर्धेत सहभागी झालेल्या अनेक महिला आज पूनम विधाते यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेत असून, त्या त्यांच्या विजयासाठी खंबीरपणे उभ्या आहेत.
“पूनम विधाते यांनी केवळ निवडणुकीच्या काळातच नव्हे, तर सातत्याने महिलांसाठी काम केले आहे. त्यामुळे त्या आमच्या लाडक्या बहिणी आहेत,” अशी भावना प्रभागातील महिलांनी व्यक्त केली. महिलांचा हा उत्स्फूर्त पाठिंबा पाहता, लाडक्या बहिणींच्या ताकदीवर पूनम विधाते या प्रचंड मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास महिलावर्गातून व्यक्त होत आहे.
प्रभाग क्रमांक ९ मधील निवडणूक लढत दिवसेंदिवस रंगतदार होत असताना, महिलांचा हा संघटित पाठिंबा पूनम विधाते यांच्यासाठी निर्णायक ठरण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
पक्षाने उमेदवारी कापली असली तरी समाजाप्रती असलेल्या जाणीवेतून अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. प्रभागात सातत्याने महिलांसाठी काम केले आहे, व यापुढेही करत राहणार आहे. या केलेल्या कामामुळेच आज मला उस्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. प्रभागात असलेल्या नव्या महिला उमेदवारापेक्षा आपल्या परिचयाच्या व ओळखीच्या आपल्या हक्काच्या महिला उमेदवाराला नागरिक नक्कीच साथ देतील असा माझा विश्वास आहे.