

संतोष चोपडे
धानोरी : पुणे स्टेशन-जय जवाननगर हा नव्याने तयार झालेला प्रभाग क्रमांक 13 झोपडपट्टी आणि मध्यमवर्गीय लोकवस्तीचा आहे. आत्तपर्यंत हा परिसर नेहमीच काँग््रेासधार्जिणा राहिला आहे. पुणे स्टेशन, ताडीवाला रोड या भागातून वर्षानुवर्षे काँग््रेासचे उमेदवार निवडून येतात. त्यामुळे या भागात 2017 पर्यंतचीच पुनरावृत्ती होईल, असे निवडणुकीदरम्यान बहुतांश जणांना वाटत होते. मात्र, येथील चारपैकी एक जागा गमवावी लागली. साहजिकच काँग््रेासच्या या बालेकिल्ल्यात अनपेक्षितपणे ‘कमळ’ फुलले.
या प्रभागातील निवडणूक ही काँग््रेासचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्यासाठी अतिशय प्रतिष्ठेची होती. पूर्ण पॅनल निवडून आणण्यासाठी त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, काँग््रेास पक्षातील बंडखोरी, अन्य कोणत्याही पक्षाची साथ वा अन्य पक्षांसोबत आघाडी नसणे तसेच अपक्ष उमेदवार अशा विविध कारणांमुळे हक्काच्या प्रभागातील ‘अ’ गटात काँग््रेासच्या उमेदवाराला पराभव पत्कारावा लागला. तब्बल 46 वर्षांनंतर भाजपला नीलेश आल्हाट यांच्या रूपात आपले वर्चस्व येथे सिद्ध करता आले. एकाच कुटुंबात वर्षानुवर्षे उमेदवारी देऊ नये, इतरांना संधी द्यावी, अशी मागणी असूनही या प्रभागातील ‘अ’ गटातून माजी नगरसेविका लता राजगुरू यांचे चिरंजिव कुणाल राजगुरू यांना काँग््रेासने उमेदवारी दिली होती.
त्यामुळे इथे काँग््रेासमधून बंडखोरी झाली. त्याचबरोबर राष्ट्रवादीनेही तत्कालीन नगरसेवक प्रदीप गायकवाड यांच्याऐवजी त्यांच्या भावाची मुलगी दीक्षा एकनाथ गायकवाड यांना उमेदवारी दिली. याच गटातून राष्ट्रवादीचे माजी आमदार जयदेव गायकवाड यांच्या सून डॉ. निकिता गायकवाड यांनी वंचितकडून (अ) गटातून उमेदवारी मिळवली. भाजपचे निलेश आल्हाटसह काँग््रेास बंडखोर सुजित यादव, राष्ट्रवादीचे संतोष उर्फ पिनू गायकवाड आणि किशोर रिकीबे (अपक्ष), आनंद जाधव (मनसे), अर्चना केदारी (बसपा) असे अकरा उमेदवारांनी ‘अ’ गटातून निवडणुकीला उभे होते. या सर्व मत विभाजनाचा फायदा निलेश आल्हाट यांना मिळाला आणि शेवटच्या फेरीत 10 हजार 886 मते मिळवत काँग््रेासच्या राजगुरू यांना (9,989 मते)897 मतांनी पराभव केला.
पुणे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी ‘ड’ गटातून निवडणूक लढवली होती. त्यांच्यासमोर भाजपचे सूर्यकांत निकाळजे आणि राष्ट्रवादीचे विकार अहमद मुख्तार शेख यांचे आव्हान होते. या तिरंगी लढतीत सुरुवातीच्या प्रचाराच्या काळात रंगत वाढली होती. मात्र, प्रचाराची सांगता होत असताना काँग््रेासचे पारडे जड होत गेले आणि अरविंद शिंदे यांना 11 हजार 777 मते मिळाली आणि निकाळजे यांचा 1 हजार 924 मतांनी पराभव केला.
प्रभागातील ‘ब’ गटातून माजी नगरसेविका चाँदबी नदाफ यांच्या सून सुमय्या नदाफ यांना काँग््रेासने उमेदवारी दिली. या गटात प्रमुख तीन पक्षांचे तीनच उमेदवार रिंगणात होते. भाजपकडून शोभा मेमाने, तर राष्ट्रवादीकडून माजी नगरसेविका श्वेता चव्हाण होत्या. प्रचारादरम्यान सुमय्या नदाफ यांचेच पारडे जड वाटत होते आणि मतमोजणीच्या दिवशीही पहिल्या फेरीपासून शेवटच्या फेरीपर्यंत सुमय्या नदाफ यांनी प्रचंड आघाडी घेत होत्या. त्यांनी 15 हजार 811 मते मिळवली आणि भाजपच्या शोभा रमेश मेमाने यांचा 6 हजार 93 मतांनी पराभव केला.
सामाजिक कार्यकर्त्या नीलम गायकवाड यांनी निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी ‘क’ गटातून निवडणूक लढवली तर भाजपकडून माजी नगरसेवक संजय भोसले यांच्या पत्नी अश्विनी भोसले यांनी निवडणूक लढवली, त्यांनीही निवडणुकीच्या तोंडावर भाजपकडून तिकीट मिळविले. येरवडा, जय जवाननगर आणि परिसरातील काही भाग असल्याने त्यांनी प्रभाग तेरामधून निवडणूक लढवली होती तर बसपकडून सुमन गायकवाड यांनाही उमेदवारी मिळाली होती. याच गटातून ‘वंचित’कडून उमेदवारी मिळालेल्या स्वाती धनगर यांना 3940 मतदान झाले. साहजिकच हे सर्व काँग््रेासच्या येरवडा भागातील रहिवाशी असलेल्या वैशाली भालेराव यांच्या पथ्यावर पडले आणि त्यांना तब्बल 10 हजार 513 इतके मतदान झाले. त्यांनी भाजपच्या अश्विनी भोसले यांचा 750 मतांनी पराभव केला.