Pune Vehicle Sales Gudipadwa: गुढीपाडव्याला पुणेकरांची वाहन खरेदीत विक्रमी उसळी

13 हजारांहून अधिक वाहनांची नोंदणी; इलेक्ट्रिक वाहनांनाही मोठी पसंती
Vehicle
VehiclePudhari
Published on
Updated on

पुणे: साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्यानिमित्त यंदा पुणेकरांनी वाहन खरेदीला मोठ्या प्रमाणावर पसंती दिल्याचे चित्र पाहायला मिळाले. प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, 13 हजारांहून अधिक वाहनांची खरेदी झाल्याचे समोर आले आहे. यानुसार इंधनावरील 11,937 वाहने, तर इलेक्ट्रिकवरील 1,530 नव्या वाहनांची नोंद गुढीपाडव्यानिमित्त पुण्यात झाली आहे.

Vehicle
Pune Construction Debris Dumping: पुण्यात राडारोडा टाकणाऱ्यांवर सीसीटीव्हीची नजर; महापालिकेचा कडक इशारा

आरटीओने दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या गुढीपाडवा काळात म्हणजेच दि. 7 ते 17 मार्च 2026 या कालावधीत 11,937 इंधनावरील, तर 1,530 इलेक्ट्रिक, अशा एकूण 13 हजार 447 नव्या वाहनांची पुणेकरांनी खरेदी केली आहे. त्याची नोंदणी प्रक्रिया पुणे आरटीओ कार्यालयांत गेल्या आठवडाभरापासून सुरू होती. पुणेकरांना वाहने वेळेत मिळावीत, वाहनांच्या नोंदणी प्रक्रियेचे काम वेळेत व्हावे, यासाठी आरटीओ कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारीवर्गाने प्रयत्न केले.

Vehicle
Pune Wanwadi Murder Case: पुण्यात वानवडीत तरुणाची बॅटने मारहाण करून हत्या; पाच जणांवर गुन्हा

गुढीपाडव्याच्या दिवशी शोरूममध्ये होणारी प्रचंड गर्दी आणि कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी लागणारा वेळ टाळण्यासाठी अनेक पुणेकरांनी स्मार्ट पर्याय निवडला. यंदा अनेक वाहन खरेदी करणाऱ्या ग््रााहकांनी गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येलाच आपल्या आवडत्या वाहनांची डिलिव्हरी केल्याचे दिसून आले. पाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर गुढी उभारून नवीन वाहनाची पूजा करता यावी, यासाठी आम्ही आदल्या दिवशीच गाडी घरी नेत असल्याचे या वेळी अनेक ग््रााहकांनी सांगितले.

Vehicle
Pune APK File Cyber Fraud: पुण्यात APK फाइलद्वारे सायबर फसवणूक; दोघांचे 10 लाख लंपास

वाहन खरेदीची आकडेवारी

इंधनावरील वाहने - इलेक्ट्रिक वाहने

  • दुचाकी: 7,986 - 1276

  • चारचाकी: 2,660 - 226

  • टुरिस्ट टॅक्सी: 287 - 12

  • बस: 44 - 00

  • ऑटोरिक्षा: 267 - 08 - 457 - 05

  • थी-व्हीलर: 69 - 03

  • ट्रॅक्टर: 00 - 00

  • इतर वाहने: 00 - 00

  • एकूण इंधनावरील वाहने: 11937

  • एकूण इलेक्ट्रीक वाहने: 1530

Vehicle
Maharashtra Board Exam Malpractice: दहावी-बारावी परीक्षेत गैरप्रकार; 309 विद्यार्थी पकडले, 103 शिक्षक निलंबित

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदीसाठी पुणेकरांमध्ये मोठा उत्साह असतो. यंदा आम्ही नोंदणीची प्रक्रिया सुलभ केली होती. त्यामुळे ऐन पाडव्याच्या दिवशी नागरिकांना त्यांच्या वाहनांची डिलिव्हरी घेणे सोपे होईल, यासाठी प्रयत्न करण्यात आले. यंदा इंधनावरील आणि इलेक्ट्रिकवरील 13 हजार 447 नव्या वाहनांची नोंदणी पुणे आरटीओ कार्यालयात करण्यात आली आहे.

स्वप्निल भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news