Pune APK File Cyber Fraud: पुण्यात APK फाइलद्वारे सायबर फसवणूक; दोघांचे 10 लाख लंपास

मोबाईलवर फाइल उघडताच खात्यातून रक्कम गायब; सायबर गुन्हेगारांविरुद्ध गुन्हा दाखल
Cyber Fraud
Cyber FraudPudhari
Published on
Updated on

पुणे: एपीके फाइल पाठवून सायबर चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनेत ज्येष्ठ नागरिकासह दोघांची दहा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी, स्थानिक पोलिस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार सायबर चोरट्यांच्या विरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल केले आहेत.

Cyber Fraud
Maharashtra Board Exam Malpractice: दहावी-बारावी परीक्षेत गैरप्रकार; 309 विद्यार्थी पकडले, 103 शिक्षक निलंबित

सिंहगड रोड परिसरातील एका तरुणाच्या मोबाईलवर एपीके फाइल पाठवून सायबर चोरट्यांनी सात लाख 66 हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना नुकतीच घडली. याबाबत तरुणाने नऱ्हे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्यांनी तरुणाच्या मोबाईल क्रमांकावर एपीके फाइल पाठविली होती.

Cyber Fraud
IT Employees Tribunal India: आयटी कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र ट्रिब्यूनल; कामगार मंत्र्यांची घोषणा

एपीके फाइल उघडल्यानंतर चोरट्यांनी तरुणाच्या बँक खात्यातून सात लाख 66 हजार रुपये लांबविले. चोरट्यांनी तरुणाच्या खात्यातील रक्कम दुसऱ्या खात्यात वळविली. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर तरुणाने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक आसाराम शेटे तपास करत आहेत.

Cyber Fraud
Pune Co-Opted Corporators: पुणे मनपात स्वीकृत नगरसेवक नियुक्ती; कागदपत्रे अपूर्ण राहिल्यामुळे दोन उमेदवारांची प्रक्रिया रखडली

दुसऱ्या एका घटनेत बिबवेवाडी भागातील एका ज्येष्ठ नागरिकाची सायबर चोरट्यांनी दोन लाख 22 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार ज्येष्ठ नागरिकाच्या मोबाईल क्रमांकावर एका विमान कंपनीच्या नावे बनावट संदेश पाठविला होता.

Cyber Fraud
Pune Commercial Gas Shortage: पुण्यात व्यावसायिक गॅस टंचाई; मेस-हॉटेल बंद, विद्यार्थ्यांचे हाल

संबंधित संदेश असलेली एपीके फाइल उघडल्यानंतर सायबर चोरट्यांनी त्यांच्या बँक खात्यातून दोन लाख 22 हजार रुपयांची रक्कम चोरून नेली. चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाच्या बँक खात्याला जोडलेला मोबाईल क्रमांक हॅक करून खात्यातून रोकड काढून घेतल्याचे उघडकीस आले आहे. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सूरज बेंद्रे तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news