Pune Vegetable Market Prices: पुण्यात भाजीपाला बाजारात मंदी; पालेभाज्यांचे दर मात्र कडाडले

उष्णतेमुळे मागणी घटली; भेंडी, गवार स्वस्त तर कोथिंबीर-मेथी महाग
Vegetable
VegetablePudhari
Published on
Updated on

शंकर कवडे

पुणे: उन्हाच्या तडाख्यासह उष्णतेच्या झळा तीव्र झाल्याने नागरिक खरेदीसाठी कमी प्रमाणात बाहेर पडत आहेत. त्यामुळे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीतील तरकारी विभागात दाखल होत असलेल्या फळभाज्यांना अपेक्षित उठाव नसल्याचे चित्र आहे.

Vegetable
Pune Fruit Market Prices: पुण्यात उन्हाचा परिणाम; कलिंगड-खरबूज दर वाढले, डाळिंब स्वस्त

रविवारी बाजारात राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे 90 ट्रक फळभाज्यांची आवक झाली. मागील आठवड्याच्या तुलनेत आवक दहा ट्रकने घटली. मात्र, मागणीअभावी भेंडी, गवार, गाजर, हिरवी मिरची, शेवगा आणि तोतापुरी कैरीच्या भावात दहा ते वीस टक्के घट झाली होती. तर, आवक कमी झाल्याने केवळ श्रावणी घेवड्याच्या भावात काहीशी वाढ झाली होती.

Vegetable
Pune Bhusar Market Slowdown: पुणे भुसार बाजारात मंदी; खोबरे, शेंगदाण्याचे दर घसरले

गुलटेकडी मार्केट यार्डातील तरकारी विभागात परराज्यांतून झालेल्या आवकेमध्ये कर्नाटक, उत्तर प्रदेश येथून हिरवी मिरची सुमारे 14 ते 15 टेम्पो, भुईमूग शेंग कर्नाटक आणि गुजरात प्रत्येकी 1 टेम्पो, गाजर कर्नाटक 5 टेम्पो, आंध्र प्रदेश, तामिळनाडू येथून तोतापुरी कैरी 4 ते 5 टेम्पो, कर्नाटक येथून कोबी 3 ते 4 टेम्पो, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून शेवगा 4 ते 5 टेम्पो, कर्नाटक येथून घेवडा 2 टेम्पो, गुजरात कर्नाटकमधून भुईमूग शेंग प्रत्येकी 2 ते 3 टेम्पो, हिमाचल येथून वाटाणा 3 टेम्पो, मध्य प्रदेश येथून लसणाची सुमारे 10 ते 12 टेम्पो तर इंदूर, आग्रा, गुजरात आणि स्थानिक भागांतून बटाटा 40 टेम्पो इतकी आवक झाली होती.

Vegetable
Chakan Vegetable Market Rates: चाकण बाजारात विक्रमी आवक; भाजीपाल्याचे दर कायम तेजीत

स्थानिक भागातून झालेल्या आवकमध्ये सातारी आले सुमारे 450 ते 500 गोणी, भेंडी 6 ते 7 टेम्पो, गवार 4 ते 5 टेम्पो, टोमॅटो 8 ते 10 हजार क्रेट, हिरवी मिरची 4 ते 5 टेम्पो, काकडी 7 ते 8 टेम्पो, फ्लॉवर 10 ते 12, कोबी 4 ते 5 टेम्पो, ढोबळी मिरची 8 ते 10 टेम्पो, गाजर 5 टेम्पो, तांबडा भोपळा 10 ते 12 टेम्पो, घेवडा 2 टेम्पो, पावटा 2 ते 3 टेम्पो, शेवगा 2 टेम्पो, घेवडा 2 टेम्पो, कांदा सुमारे 100 टेम्पो इतकी आवक झाली, अशी माहिती मार्केट यार्डमधील ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी दिली.

Vegetable
Pune Fish Price Rise: पुण्यात मासळीचे दर तेजीत; कमी आवकामुळे ग्राहकांना झळ

पालेभाज्या कडाडल्या

उन्हामुळे पालेभाज्यांच्या उत्पादनावर परिणाम होऊ लागला आहे. परिणामी, पालेभाज्यांच्या उत्पादनात घट होत चालली आहे. पुणे बाजार समितीच्या तरकारी विभागात पालेभाज्यांची आवक कमी होत आहे. बाजारात आवक कमी झाल्याने रविवारी (दि. 26) कोथिंबीर, मेथीच्या शेकडा भावात 500 रुपयांनी वाढ झाली होती. तसेच, शेपूच्या शेकडा भावात 300, अंबाडीच्या 200 रुपये, राजगिरा 100 रुपये वाढ झाली आहे. केवळ पुदिनाच्या शेकडा भावात 200 रुपयांनी घट झाली होती. रविवारी (दि. 26) पालेभाज्यांमध्ये कोथिंबीर सुमारे 90 हजार जुडी, तर मेथीची 50 हजार जुड्यांची आवक झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news