BITS Pilani Goa Student Deaths | बिट्स पिलानी कॅम्पस, 14 महिन्यांत 6 मृत्यू; 'युवा फॉरवर्ड'कडून उच्चस्तरीय चौकशीची मागणी

BITS Pilani Goa Student Deaths | युवा फॉरवर्ड शिष्टमंडळाचे राज्यपालांना निवेदन; मांडली समस्या
BITS Pilani Goa Student Deaths
BITS Pilani Goa Student Deaths
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

बिट्स पिलानी गोवा कॅम्पसमध्ये झालेल्या निष्पाप विद्यार्थ्यांच्या मृत्यूची उच्चस्तरीय स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करणारे औपचारिक निवेदन हृतिक मांद्रेकर यांच्या नेतृत्वाखालील गोवा फॉरवर्ड पक्षाच्या युवा शाखेच्या युवा फॉरवर्डच्या शिष्टमंडळाने राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांना सादर केले.

BITS Pilani Goa Student Deaths
Goa Drug Case | गोवा पोलिसांचा ड्रग्ज माफियांना दणका; गतवर्षी 78.48 कोटींचा ड्रग्ज साठा जप्त

डिसेंबर २०२४ ते फेब्रुवारी २०२६ दरम्यान सहा विद्यार्थ्यांच्या मृत्यूची नोंद झाली आहे आणि प्रत्येक प्रकरणात या घटना परीक्षेच्या काळात किंवा तीव्र शैक्षणिक दबावाच्या टप्प्यात घडल्या आहेत, ज्यामुळे विद्यार्थ्यांना किती तीव्र ताण सहन करावा लागत आहे हे स्पष्ट होते.

सहा तरुणांचे बळी गेले असताना आतापर्यंत कोणतेही तपशीलवार चौकशी अहवाल सार्वजनिक केलेले नाहीत, ज्यामुळे पारदर्शकता आणि संस्थात्मक जबाबदारीबद्दल गंभीर चिंता निर्माण झाली आहे.

BITS Pilani Goa Student Deaths
Sinnar News: सिन्नरचा पाणीपुरवठा तीन- चार दिवस बंद राहणार? कारण समोर

हे अहवाल फाईलींमध्ये बंदिस्त राहू शकत नाहीत. विद्यार्थी आणि पालकांना सत्य जाणून घ्यायचे आहे आणि त्यावर त्वरित उपाययोजना राबवल्या पाहिजेत त्यामुळे हस्तक्षेप करण्याची विनंती राज्यपालांना या शिष्टमंडळाने केली.

युवा फॉरवर्डच्या शिष्टमंडळाने उच्चस्तरीय स्वतंत्र चौकशी, सर्व निष्कर्षांची संपूर्ण सार्वजनिक माहिती आणि समुपदेशन प्रणाली, विद्यार्थी कल्याण यंत्रणा आणि कॅम्पसमध्ये ताण व्यवस्थापन समर्थन मजबूत करण्यासाठी तातडीने संस्थात्मक सधारणा करण्याची मागणी केली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news