Pune Unseasonal Rainfall: पुण्यात अवकाळी पावसाचा जोर; मगरपट्ट्यात सर्वाधिक १८ मिमी पावसाची नोंद

दिवाळी खरेदीसाठी बाहेर पडलेल्या पुणेकरांची तारांबळ; ५ नोव्हेंबरपर्यंत हलक्या ते मध्यम पावसाचा हवामान विभागाचा अंदाज
Rain
RainPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: रविवारी पहाटे शहरात दमदार पावसाने हजेरी लावली. शहरात सरासरी ५ ते ७ मि.मी पाऊस बरसला. सर्वाधिक पाऊस मगरपट्टा भागात १८ मि.मी इतकी नोंद झाली. दरम्यान, सोमवार आणि मंगळवारी देखील शहरात हलका ते मध्यम पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

Rain
Baramati Heavy Rainfall: बारामतीत तीन महिन्यांनंतर पावसाची जोरदार हजेरी; रस्ते जलमय

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या मुरासू या चक्रीवादळामुळे शहरात बाष्पयुक्त वाऱ्यांचा वेग वाढला आहे. शनिवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते मात्र पाऊस बरसला नाही. रविवारी पहाटे ५ ते ६ या वेळेत शहरातील काही भागात कमी-जास्त वेगाने पाऊस झाला. पहाटेची वेळ असल्याने पावसाचा आवाज स्पष्टपणे ऐकू येत होता. शहरातील मगरपट्टा, हडपसर, कात्रज या भागात जास्त जोर होता.

Rain
Pune Vegetable Prices: मार्केट यार्डात भाज्यांची आवक वाढली; टोमॅटो, मिरचीसह अनेक भाज्या स्वस्त!

रविवारी रात्री सव्वाआठ ते सकाळी साडेआठच्या दरम्यान अचानक जोरदार पावसाच्या सरींनी शहरात हजेरी लावली. रविवारी पहाटे पाच ते सहा वाजता झालेल्या पावसाने वातावरण दिवसभर गार झाले होते. दिवसभर कडक ऊन पडले होते.

Rain
Pune Diwali Grocery Market: दिवाळी तोंडावर, तरी भुसार बाजारात खरेदीचा उत्साह मंदावला!

सायंकाळी पुन्हा गारवा जाणवू लागला आणि रात्री अचानक जोरदार पावसाने वाहनधारकांसह विक्रेत्यांची आणि दिवाळीची खरेदी करण्यासाठी निघालेल्या पुणेकरांची तारांबळ उडवून दिली. या पावसाने रस्ते जलमय झाले. सखल भागांत पाणी साचले आणि गारवा सुटला. ५ नोव्हेंबरपर्यंत शहरात हलका ते मध्यम पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.