Pune University Mess Issue: पुणे विद्यापीठात मेस संकट; गॅसटंचाईमुळे विद्यार्थ्यांचे हाल

परीक्षांच्या काळात अन्नटंचाई; प्रशासनाकडून तत्काळ उपाययोजनेची मागणी
Pune University
Pune UniversityPudhari
Published on
Updated on

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध वसतिगृहांमधील काही मेस बंद झाल्या आहेत, तर फूडमॉलमधील केवळ दोनच स्टॉल चालू आहेत. त्यामुळे ऐन परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांचे जेवणाचे हाल होत असून, विद्यापीठ प्रशासनाने याचा गांभीर्याने विचार करून संबंधित समस्येवर तत्काळ तोडगा काढण्याची मागणी विद्यार्थी संघटनांनी केली आहे.

Pune University
Pune Investment Fraud: पाण्याच्या प्लांट गुंतवणुकीत 2.34 कोटींची फसवणूक; बाप-लेकांवर गुन्हा

विद्यापीठातील विविध वसतिगृहांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्याचप्रमाणे विद्यापीठातील रिफेक्ट्रीमध्ये जेवण करण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्यासुद्धा मोठी आहे. मात्र, येथील वसतिगृहांतील मेसमध्ये गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून मेस चालकांनी मर्यादित अन्नपदार्थ तयार करण्यास सुरुवात केली असून, अन्नपदार्थांचे दरसुद्धा वाढवले आहेत.

Pune University
Pune Government Hospital: पुण्यात एमआरआय-सीटी स्कॅनची कमतरता; गरीब रुग्णांची परवड

तसेच काही मोजकेच पदार्थ बनविण्यास सुरुवात केली आहे. विद्यापीठातील विविध वसतिगृहांत मेस चालवणाऱ्या मेस चालकांनी विद्यापीठाच्या प्रशासनाशी याबाबत संपर्क साधला आहे. व्यावसायिक सिलिंडरच्या पुरवठ्याबाबत निश्चिंत राहा, असे सांगणाऱ्या विद्यापीठ प्रशासनाने प्रत्यक्षात गॅस उपलब्धच करून दिला नाही. त्यामुळे गॅस मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना अन्नपदार्थ तयार करून देणे शक्य नसल्याचे मेसचालकांकडून स्पष्ट केले आहे.

Pune University
Maharashtra 11th Admission Process: अकरावी प्रवेश प्रक्रिया पुन्हा ऑनलाइन; विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन केंद्रे सुरू

या सर्व घटनांमुळे विद्यापीठातील विद्यार्थ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असून, ऐन परीक्षांचा काळ असल्यामुळे विद्यापीठ सोडणे देखील विद्यार्थ्यांना शक्य नाही. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या या समस्येकडे गांभीर्याने पाहून यावर तोडगा काढण्याची मागणी केली आहे.

Pune University
Pune Stray Dogs Issue: पुण्यात भटक्या श्वानांचा वाढता उपद्रव; फीडिंग पॉइंट धोरणावर प्रश्नचिन्ह

गॅसटंचाईमुळे सध्या विद्यापीठांमधील मेस उपाहारगृहे आणि भोजनगृहामध्ये अन्न पदार्थ कमी करण्यात आले आहेत. सध्या एकच भाजी दिली जात आहे. काही मेसचालकांनी चुलीचा वापर सुरू केल्याचे समजत आहे. परीक्षांच्या काळात विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही. याची काळजी विद्यापीठ प्रशासनाने घेतली पाहिजे. जर भविष्यात अजून अन्नटंचाई निर्माण झाली, तर लवकरच आम्हाला तीव आंदोलन करावे लागेल.

राहुल ससाणे, अध्यक्ष, विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news